Gurumauli Annasaheb More speaking at the inauguration of the Agricultural Festival. Crowds present nearby. esakal
नाशिक

Gurumauli Annasaheb More : शालेय अभ्यासक्रमात ‘कृषी’चा समावेश करा : गुरुमाउली आण्णासाहेब मोरे

शेतीविषयीची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करावा, अशी मागणी गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी केली.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शेतकरी हे आधुनिक काळातील ऋषी आहेत. शेतीविषयीची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करावा, अशी मागणी गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी केली. (Gurumauli Annasaheb More statement Include Agriculture in School Curriculum nashik news)

नाशिकच्या गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित कृषी महोत्सवाचे बुधवारी (ता. २४) उद्‍घाटन झाले.

या वेळी व्यासपीठावर कृषी महोत्सव आयोजक आबासाहेब मोरे, चंद्रकांत मोरे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार सीमा हिरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, सरचिटणीस हेमंत धात्रक, उपायुक्त सुनील सैंदाणे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे, निवृत्ती लाड, सप्तशृंगी देवस्थानचे विश्वस्त भूषण तळेकर, कृषी उपसंचालक मोहन वाघ, अभिनेते डॉ. नीलेश साबळे, रुची कुंभारकर, सुनील बगूल, जयंत दिंडे उपस्थित होते.

गुरुमाउली आण्णासाहेब मोरे म्हणाले, की शेतकरी हे आधुनिक काळातील ऋषी आहेत. जो शेती करतो, तो ऋषी, तो निसर्गपुत्र आहे. ‘अन्न हे परब्रह्म’ असे म्हटले जाते. त्यामुळे अन्न निर्माण करणारा तो खरा ब्राह्मण आहे.

शेतीतून मोती पिकविण्याची ताकद त्याच्यात असल्याचे सांगितले. आमदार तटकरे यांनी, कोकणातही असे कृषी महोत्सव घेण्याचे आवाहन गुरुमाउलींना केले. माजी आमदार डॉ. तांबे यांनी आध्यात्मिक बैठक आवश्यक असल्याचे सांगत समस्याग्रस्त असताना माउलीच आधार देतात, असे सांगितले.

विभागीय कृषी उपसंचालक वाघ यांनी चांगल्या आरोग्यासाठी असे कार्यक्रम होणे आवश्यक आहे. शेतकरी टिकविण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न होत असल्याचे सांगितले.

कुलगुरू सोनवणे यांनी शेती, संस्कार आणि अध्यात्म यांचा त्रिवेणी संगम आपल्या मनोगतातून व्यक्त केला. आमदार हिरे यांनी शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास हा हेतू समोर ठेवून हा महोत्सव उभा करण्यात आल्याचे सांगितले.

शहरात कृषी दिंडी

कृषी प्रदर्शनानिमित्त शहरात कृषी दिंडीचे आयोजन करण्यात आले. यात शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या गोष्टींचा प्रसार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT