Gurumauli Annasaheb More  esakal
नाशिक

Gurumauli Annasaheb More : वितुष्ट आणायला कारण पैसाच : गुरुमाउली आण्णासाहेब मोरे

मनुष्याची सर्व धडपड शाश्वत समाधान मिळविण्यासाठी चालू असते.

सकाळ वृत्तसेवा

Gurumauli Annasaheb More : मनुष्याची सर्व धडपड शाश्वत समाधान मिळविण्यासाठी चालू असते. ते समाधान फक्त स्वामींजवळ असल्याने समाधानासाठी प्रत्येक माणसाला स्वामी महाराजांची गरज आहे.

आपल्या सर्व धडपडीतून परब्रह्माच्या प्राप्तीचे समाधान मिळत नाही, त्याला परिस्थितीसंबंधी विचार करताना एक बाह्य परिस्थिती आणि दुसरी अंतर स्थिती यांचा विचार करावा लागेल. (Gurumauli Annasaheb More statement Money is reason for discord nashik news)

बाह्य परिस्थितीचा विचार करताना प्रथम आपली शरीर प्रकृती आड येते. वास्तविक, प्रकृती कशीही असली तरी स्वामींचे स्मरण आपल्याला करता येते. प्रकृतीला कितीही क्षीणत्व आले, देहाला कितीही विकलता आली, तरी अंतकाळी भगवंताचे स्मरण करता येते, असे भगवंताने गीतेत सांगितले आहे, असे गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी सांगितले.

श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर गुरुपीठात शनिवारी (ता. १०) झालेल्या सेवामार्ग बैठकीत सेवेकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. चंद्रकांतदादा मोरे, नितीनभाऊ मोरे यांची या वेळी उपस्थिती होती. गुरुमाउली म्हणाले, की आर्थिक अडचणींमुळे प्रपंचात काळजी उत्पन्न होऊन, भगवंताकडे लक्ष द्यायला सवड मिळत नाही, असे काही जण सांगतात.

वास्तविक, जगात भरपूर धन मिळवून वैभवाच्या शिखरावर पोहोचलेले किती लोक नामस्मरण करतात? त्यामुळे पैसा नसणे हे भगवंताच्या प्राप्तीच्या आड येते, हे म्हणणे बरोबर नाही. उलट, पैसा हा भगवंताची निष्ठा फार कमी करतो. सुख, समाधान हे पैशांवर अवलंबून नाही. प्रत्येकाची गोतावळी ठरलेली असते. वेताळाची स्वारी निघाली की त्याच्याबरोबर पिशाच्चे असतात.

भगवंताची स्वारी निघाली की त्याच्याबरोबर दया, क्षमा, आनंदी वृत्ती असतेच, त्याचप्रमाणे पैसा आला की त्याच्याबरोबर तळमळ, लोभ, असमाधान हे असतातच. पैसा आपण वापरू तसा वापरला जातो. बाप-मुलगा, भाऊ-भाऊ, भाऊ-बहीण, मित्र-मित्र यांच्यात वितुष्ट आणायला काही कारण असेल तर पैसाच असल्याचे सांगितले. मार्गदर्शन, शंका निरसनानंतर महाप्रसादाचे वाटप झाले. या वेळी राज्यभरातील सेवेकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT