Gutkha Seized esakal
नाशिक

Nashik Crime News: घोटी टोलनाक्यावर साडेचौदा लाखांचा गुटखा जप्त

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News: राज्यात बंदी व साठा, वितरणास बंदी असलेला १४ लाख ३४ हजार रुपयांचा गुटखा घोटी टोलनाक्यावर शुक्रवारी (ता. १५) रात्री दहाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला. पोलिसांनी तिघांवर कारवाई करून दोघांना अटक केली आहे. (Gutkha worth 14 and half lakh seized at Ghoti toll booth nashik crime news)

मुंबई-नाशिक मार्गावरून गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर यांना मिळाली. त्यावरून दुपारपासूनच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जागोजागी तळ ठोकून उभे होते.

घोटी टोलनाक्यावर मुंबईच्या दिशेने जाणारा आयशर ट्रक (एमएच ०४, इवाय ९७६८)चालकाला रात्री दहाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाहन बाजूला घेण्यास सांगितले. त्यावर चालकाने ट्रक जोराने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. इतर पोलिसांनी तातडीने वाहन आडवे लावून त्याला पोलिसी खाक्या दाखविल्या.

एक संशयित अंधाराचा फायदा घेऊन फरारी झाला, तर दोघांना अटक करण्यात आली. सुनील भवरलाल गुप्ता (वय ३२, रा. सहा महाढा, ता. फत्तेपूर, उत्तरप्रदेश), सोहेलखान शकील खान (वय २३, रेहमा अपार्टमेंट, बाबूपुरा कानपूर) यांना अटक केली, तर मोहंमद परवेजखान फरारी झाला.

वाहनाची तपासणी केली असता, आत प्लॅस्टिक गोण्यांमध्ये १४ लाख ३४ हजार तीनशे रुपयांचा गुटखा व दहा लाख रुपयांचे वाहन, असा एकूण २४ लाख, ४४ हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल पकडण्यात आला. जप्त केलेल्या मालाची किंमत करण्याच्या उद्देशाने ५० पैसे, दोन रुपये, असे छापल्याचे पोलिसांचे मत आहे.

बाजार किंमत पाहता अंदाजे मालाची किंमत एक ते सव्वा कोटीच्या आसपास असण्याचा अंदाज आहे. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर, हवालदार योगेश पाटील, शांताराम घुगे, प्रशांत पाटील यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

Pali Census : 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमानात 'सुपरहिरो' बनून फिरतायत शिक्षक; उन्हाच्या लाहीलाहीतही जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य अविरत सुरू

Nashik POCSO Case : नाशिकमध्ये गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा; 15 वर्षांच्या विद्यार्थिनीचे फोटो काढून शिक्षकाने केले ब्लॅकमेल, मनसूरचे धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT