crime esakal
नाशिक

Nashik Crime News : मालेगावात 4 ठिकाणी 35 हजाराचा गुटखा जप्त

शहर व परिसरात जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथक व छावणी पोलिसांनी चार वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून सुमारे ३५ हजार ८१४ रुपयांचा गुटखा जप्त केला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : शहर व परिसरात जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथक व छावणी पोलिसांनी चार वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून सुमारे ३५ हजार ८१४ रुपयांचा गुटखा जप्त केला. अवैधरीत्या गुटखा विक्री प्रकरणी पोलिसांनी या कारवाईत चौघांना अटक केली असून एक संशयित फरार झाला आहे.

अवैध गुटखा विक्री विरोधात जिल्हा पोलिसांची मोहीम सातत्याने सुरूच आहे. (Gutkha worth 35 thousand seized at 4 places in Malegaon nashik crime news)

बुनकर बाजारजवळील यादगार हॉटेलजवळ विशेष पथकाने छापा टाकून उबेद हारुण चाऊस (३०, रा. हिंगलाजनगर) याला अटक केली. त्याच्या ताब्यातून दहा हजार १५० रुपयांचा विविध कंपन्यांचा गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला जप्त करण्यात आला.

दुसऱ्या कारवाईत अल्लमा एकबाल पुलाजवळील सावळे पार्क येथे शिवराज किराणा येथे छापा टाकून पोलिसांनी किराणा दुकानचालक शिवाजी गुलाब अहिरे (३८, रा. संजीवन सोसायटी) याच्या ताब्यातून दहा हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला.

यात विमल, व्ही-१, विमल पान मसाला, हिरा पान मसाला, व्ही-१ तंबाखू व महारॉयल आदी प्रकारचा गुटखा मिळून आला. वडगाव रस्त्यालगत रमेश कडू सोनवणे (५८, रा. वडगाव) याच्या घराच्या जिन्याखाली पोलिसांनी छापा टाकून ९ हजार ७२४ रुपयांचा गुटखा जप्त केला. यातील नितीन वाणी (रा. करंजगव्हाण) हा संशयित फरार झाला.

येथील छावणी पोलिसांनी मोतीबाग नाका भागातील मोतीनगर गल्लीत बापू केदार कदम (६५, रा. मोतीनगर, गल्ली नं.२) याच्याकडे छापा टाकून पाच हजार ९४० रुपयांचा गुटखा जप्त केला. उपनिरीक्षक सचिन चौधरी, एस. आर. चव्हाण, एस. डी. नवले, कोळी, पोलिस शिपाई शत्रुघ्न राठोड, गौतम बोराळे, दीपक पवार, संदीप राठोड आदींनी ही कारवाई केली. या चार छाप्यांप्रकरणी शहर, छावणी व वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT