crime esakal
नाशिक

Nashik Crime News : शहरातून 37 हजाराचा गुटखा जप्त

शहरात चार वेगवेगळ्या ठिकाणी रमजानपुरा, पवारवाडी, आझादनगर, आयशानगर पोलिसांनी चार वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून सुमारे ३७ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : शहरात चार वेगवेगळ्या ठिकाणी रमजानपुरा, पवारवाडी, आझादनगर, आयशानगर पोलिसांनी चार वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून सुमारे ३७ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला.

या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. (Gutkha worth 37 thousand seized from city nashik crime news)

गांधीनगर भागातून दिलावर पेट्रोल पंपामागे छापा टाकून रमजानपुरा पोलिसांनी वाल्मिक साळुंके (रा. ४०, महात्मा गांधीनगर द्याने) व नबी मुश्‍ताक अहमद (२२, रा. द्याने) यांच्या ताब्यातून २९ हजार ९३० रुपयांचा गुटखा जप्त केला.

म्हाळदे शिवारात दुसरी कारवाई करण्यात आली. नदीम अख्तर रशीद अहमद (२९, रा. हिलालपुरा) यांच्या पान दुकानावर छापा टाकून ५ हजार ७९४ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.

प्रबुध्द नगरातील राजू महिराळे यांच्या पान दुकानावर आयशानगर पोलिसांनी छापा टाकून ३ हजार १५० रुपयांचा तर सैलानी चौकातील मिर्झा तालीब अस्लम बेग (वय २४, रा. शब्बीरनगर) यांच्या मिर्झा पान स्टॉलवर आझादनगर पोलिसांनी छापा टाकून २ हजार १०१ रुपयांचा गुटखा जप्त केला.

चार एकत्रित कारवाईत ३६ हजार ९७५ रुपयांचा गुटखा जप्त करून पाच संशयितांना अटक करण्यात आली. सहाय्यक अधिक्षक तेगबिरसिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस शिपाई सचिन बेदाडे, विनोद चव्हाण, नीलेश निकाळे, समाधान सानप व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायाधीश व्हायचं होतं, पण लग्नासाठी घरच्यांचा दबाव; वकील तरुणीनं बेपत्ता होण्याचा आखला प्लॅन, १३ दिवसांनी सापडली

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! युवा नेतृत्वासाठी मोकळी केली वाट; म्हणाला, हीच योग्य वेळ...

ठरलं तर मग! या दिवशी सुरु होणार ‘स्टार प्रवाह’वर दोन नवीन मालिका, वेळही ठरली! तर हे कलाकार घेणार प्रेक्षकांचा निरोप

Everest Base Camp: 'सातारच्या ६३ वर्षीय गिर्यारोहकाने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प';खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर फडकवला मराठी झेंडा

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

SCROLL FOR NEXT