demands to open gym
demands to open gym e-sakal
नाशिक

लॉकडाऊनमुळे जिम व्यवसायिकांची आर्थिक कोंडी; सलंग्न व्यवसायावरही परिणाम

तुषार महाले

नाशिक : कोरोनाच्या (corona) दुसऱ्या लाटेत सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. शरीर निरोगी(Health) ठेवण्यासाठी जिमचा(GYM) उपयोग होतो. शहरातील जिमच बंद असल्यामुळे जिम व्यावसायिकांसह ट्रेनर (Trainer), कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. जिमचा खर्चच महिन्याला लाख रुपये असल्यामुळे जिम व्यावसायिकांची आर्थिक कोंडी झाली आहे. (Gym owners are in financial trouble)

जिम व्यवसायाशी सलंग्न व्यवसायावर परिणाम

नाशिक शहरात जवळपास २०० हून अधिक छोटे-मोठे जिम व्यावसायिक आहेत.गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून बंद असलेला व्यवसाय सहा महिन्यानंतर ऑक्टोबर मध्ये सुरु करण्यात आला. व्यवसाय बंद असल्याने मोठ्या प्रमाणात जिम व्यावसायिकांचे नुकसान झाले होते. आर्थिक फटका बसल्यानंतर आता कुठे व्यवसाय सुरळीत येत असल्याचे दिसत होते. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गेल्या दीडमहिन्यापासून व्यवसाय बंद आहे. व्यवसायात दर महिन्याला देखभाल, दुरुस्ती, कर्मचाऱ्यांचा पगार, वीजबिल व भाडे, यासाठी लाख रुपयांचा खर्च होतो. लॉकडाउनमुळे गेल्या वर्षी सहा तर आता दीड महिन्यांपासून जिम बंद असल्याने उत्पन्नाचे साधन नाही. सर्व गोष्टींचा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे जिम व्यावसायिकांसमोर आर्थिक समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे.

जिम चालक-मालक,प्रशिक्षक, हाउसकीपिंग स्टॉफ (Housekeeping staff), योगा टीचर (Yoga Teacher), झुंबा ट्रेनर (Zumba trainer), डायटीशियन (Dietitian), मसाजिस्ट (Massage therapist), न्यूट्रिशन (Nutritinist) दुकानचालक व व्यायाम शाळा साहित्य बनवणारे कारागीर तसेच इतर अनेक पूरक व्यवसायातील कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या कुटुंबीयांचे उदरनिर्वाह चालणे कठिण झाले असून, त्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जिम व्यवसायाशी सलंग्न असलेल्या व्यवसाय सुद्धा आर्थिक कोंडीत सापडला आहे.

''जिम ट्रेनर यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यासोबतच व्यायाम करणाऱ्यांसाठी आवश्यक असणारे प्रोटिन्सची दुकानेदेखील बंद आहेत. त्यामुळे त्या व्यवसायिकांचीदेखील सध्या बिकट अवस्था आहे.''

- राहुल मनोटीया, जिम ट्रेनर

''कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये पुन्हा एकदा जिम बंद झाल्या, मागील वर्षी जिम व्यावसायिकांचे लाखोच नुकसान झाले. गतवर्षीचे नुकसान अजुन भरून निघालेल नाही. पुन्हा एकदा कठिण प्रसंगाला तोंड द्याव लागत आहे. जिमच्या जागेचे भाडे, लाईट बिल, हफ्ता भरायचा कुठून तसेच ट्रेनर्सच कुटुंब चालणार कसे असा प्रश्न आहे.''

-ईश्वर ठाकरे ,जिम ट्रेनर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Paneer Stuffed Chilla: विकेंडला बनवा पनीर स्टफ चिला, नोट करा रेसिपी

Sakal Podcast : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदुरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 मे 2024

SCROLL FOR NEXT