Risha Rathi hair donation esakal
नाशिक

Nashik : कर्करोगग्रस्‍तांसाठी रिशा राठीकडून केस दान

अरुण मलाणी

नाशिक : वाढदिवसाच्या दिवशी सौंदर्याचे आभूषण असलेल्या केसांचे दान देऊन कर्करोगाविरुद्ध लढा देणाऱ्या महिलांना आठवर्षीय रिशाने बळ दिले आहे. कर्करोगग्रस्‍त महिलांसाठी रिशा राठी हिने केस दान करत सामाजिक संदेश दिला आहे. (Hair donation by Risha Rathi for cancer patients Nashik Latest Marathi News)

उद्योजक हेमंत राठी यांची आठ वर्षाची नात रिशा आनंद राठी हिने वाढदिवसाला कर्करोगग्रस्‍त रुग्णांच्या केस रोपणाकरिता दान करण्याचा निर्णय घेतलेला होता. एक वर्षापूर्वी तिची आई डॉ. मेघा राठी यांनी केस दान केले होते.

ते पाहिल्यानंतर स्वयंस्फूर्तीने रिशाने स्वतःचे तेरा इंच लांबीचे केस कापून महिलांसाठी काम करणाऱ्‍या हेअर फार होप इंडिया प्रोटेक्ट युवर मॉम आशिया या संस्थेस नाशिक लेडीज सर्कल ११९ च्या माध्यमातून दान केले.

कर्करोग रुग्णांच्या केमो उपचारानंतर केस जाणे ही बाब रुग्णांचे मानसिक खच्चीकरण करणारी असते. त्यांना मानसिक आधार देण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. रिशाने केस दान करत इतरांनाही प्रोत्‍साहित केल्‍याने तिचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT