Felicitation
Felicitation esakal
नाशिक

Nashik News : अडीच वर्षानंतर हज कमिटी गठित; पहिल्या निवडीत नाशिकला वगळले

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : अडीच वर्षानंतर राज्य सरकारकडून हज कमिटी गठित करण्यात आली. ११ सदस्य असलेल्या कमिटीतील सध्या ४ सदस्यांची निवड करण्यात आली. येत्या काही दिवसात अन्य सदस्यांची निवड होणार आहे. त्यानंतर ११ सदस्यांमधून अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. पहिल्या ४ निवड केलेल्या सदस्यांमध्ये नाशिकला वगळण्यात आले आहे. अन्य सहा सदस्यांमध्ये शहरातील अल्पसंख्याक व्यक्तीची सदस्य म्हणून निवड करण्यात यावी, अशी मागणी मुस्लिम बांधवांकडून करण्यात आली आहे. (Haj committee formed after two half years Nashik omitted in first selection Nashik News)

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अल्पसंख्याक विकास विभागाकडून अधिसूचना काढत महाराष्ट्र राज्य हज कमिटीवर नवीन ४ सदस्याची नियुक्ती केली आहे, त्यात भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष हाजी एजाज देशमुख यांची पुन्हा महाराष्ट्र राज्य हज कमिटीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हाजी एजाज देशमुख सुचविलेल्या जालना येथील ज्येष्ठ नगरसेवक हाजी फिरोजलाला शेख चन्नुमिया तांबोळी, अहमदनगर सलीम मोहम्मदनुर बागवान आणि ठाणे येथील इरफान इस्माईल शेख यांचीदेखील महाराष्ट्र राज्य हज कमिटीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

२०२० मध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्यांच्याकडून जुनी हज कमिटी बरखास्त करण्यात आली होती. त्यानंतर कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने सुमारे दोन वर्ष कुठल्याही प्रकारच्या नियुक्ती अथवा अन्य कामे होऊ शकली नाही. त्याचा फटका कमिटी गठित करण्याच्या कामांवर झाला. त्यापाठोपाठ राजकीय घडामोडींना वेग येऊन महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यामुळे कमिटी गठित होऊ शकली नाही.

नवीन सरकार स्थापन होताच नागपूर येथे सुरू असलेल्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनाच्या सुरवातीलाच कमिटी गठित करण्यात येऊन सदस्य नियुक्ती करण्यात आली. येत्या काही दिवसात राज्य मंत्र्यांचा दर्जा असलेल्या अध्यक्षांचीदेखील निवड होणार आहे. त्यामुळे हज कमिटीच्या कामांना वेग येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS Live Score : चांगल्या सुरुवातीनंतर राहुल त्रिपाठी बाद, पण अभिषेक शर्मानं झळकावलं अर्धशतक; हैदराबादच्या 100 धावा पार

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या मतदानापूर्वी दहशतवाद्यांचा हल्ला! भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, तर एक दाम्पत्य जखमी

Pune Accident: दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपीला जामीन; पुण्यातील प्रसिद्ध बिल्डरचा आहे मुलगा

SCROLL FOR NEXT