Hajj pilgrimage Sakal
नाशिक

सलग दुसऱ्यावर्षी मुस्लिम बांधव हज यात्रेपासून वंचित

युनूस शेख

जुने नाशिक : कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता सौदी सरकारकडून यंदादेखील परदेशी भाविकांच्या हज यात्रेस बंदी घातली आहे. केवळ स्थानिक ६० हजार भाविकांना यात्रेस परवानगी दिली आहे. सलग दुसऱ्या वर्षी हज यात्रा रद्द झाल्याने मुस्लिम बांधवांमध्ये नाराजी दिसून आली. (Hajj pilgrimage cancelled for the second year in a row nashik news)

जगभरातून कोटीच्या घरात मुस्लिम भाविक सौदी येथील मक्का मदिना अशी हज यात्रा करतात. यंदा २० जुलैला हज यात्रा असणार आहे. गेल्यावर्षी कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने यात्रा रद्द केली होती. यंदा काहीशी परिस्थिती सुधारल्याने देशातील पाच ते सहा हजार मुस्लिम भाविकांना यात्रेस परवानगी मिळेल, अशी आशा वाटत होती. परंतु सौदी सरकारच्या गुरुवार (ता.१०) आलेल्या निर्णयाने भाविकांच्या आशेवर पाणी फिरले आहे. बहुतांशी भाविकांनी यात्रेस जाण्याच्या निमित्ताने लसीकरण करून घेतले होते. तसेच यात्रा आयोजन करणारे टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स हज कमिटीनेदेखील विविध प्रकारचे नियोजन करून ठेवले होते. सौदी सरकारने जगभरातील विविध देशांना पत्र पाठवून यात्रेस बंदी असल्याचे सांगितले आहे. दरवर्षी देशभरातून सुमारे १ लाख ४५ हजार भाविक यात्रेस जातात. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा शहरातील ६५ भाविकांनी ऑनलाइन अर्जदेखील केले होते. याच्यासह अन्य यात्रा जाण्यास इच्छुक असलेल्या भाविकांनादेखील यात्रेस मुकावे लागणार आहे.


सौदीतील भाविकांना परवानगी

सौदीतील लसीकरण पूर्ण केलेल्या स्थानिक १५ हजार भाविक, तसेच सौदीमध्ये अकाम (स्थानिक तसेच विविध देशातील कामानिमित्त काही वर्षापासून स्थायिक झालेले) अशा ४५ हजार असे एकूण ६० हजार स्थानिक भाविकांना सौदी सरकारकडून हज यात्रेतील धार्मिक विधीस परवानगी देण्यात आली आहे.


सौदी सरकारचे हज यात्रेस परदेशाच्या भाविकांना बंदी असल्याचे पत्र हज कमिटीस प्राप्त झाले आहे. परंतु, विविध जिल्ह्यातील टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स चालकांना मंगळवारपर्यंत अधिकृत पत्र प्राप्त होण्याची शक्यता आहे. हज यात्रेस येणाऱ्या भाविकांची इच्छा लक्षात घेता भाविकांच्या वयोमर्यादेत वाढ करावी.
- फारुख तंबोली, संचालक, हज उमराह टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स.

(Hajj pilgrimage cancelled for the second year in a row nashik news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 15 मिळतोय फक्त 35 हजारात; खरेदीसाठी उडाली झुंबड, कशी काय सुरुय ही धमाकेदार ऑफर? पाहा कुठे बूक करायचा

MI vs RCB: विराट कोहलीवर BCCI करणार कारवाई? रागाच्या भरात केले 'ते' कृत्य... मग फिल्डिंगला पण आला नाही

Dr. Ambedkar Birthplace Ambadwe : बाकी सगळं ठीक, पण विकास कुठेय? डॉ. आंबेडकरांच्या मूळ गावातील रखडलेली कामे पाहून तुमचाही होईल हिरमोड; पाहा वास्तव

हनीमूनच्या रात्री वधूच्या धक्कादायक अटी, संबंध ठेवण्यासाठी ९० लाखांची मागणी; पैसे न दिल्यानं केलं भयंकर कांड

EPF Rule: नोकरी बदलली तर 5 वर्षांचा PF नियम तुटतो का? NCP Days म्हणजे काय? पेन्शन-टॅक्सवर काय परिणाम

SCROLL FOR NEXT