report corona.jpg 
नाशिक

"माझ्या कुटुंबासोबत घडलेला हा प्रकार गंभीर.." दोन्ही आमदारांच्या अहवालांचा गोंधळ चव्हाट्यावर..काय घडले नेमके?

संतोष विंचू

नाशिक / येवला : "माझ्या कुटुंबात घडलेला हा प्रकार गंभीर आहे. लक्षणे नसल्याने आम्ही वेळीच ‘सेकंड ओपिनियन’ म्हणून दुसऱ्यांदा तपासणी केली. असे केले नसते तर आजही आम्ही कोविडचे उपचार घेत असतो". रुग्णांच्या भावनांसह जिवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. आमदारांसोबत घडलेल्या त्या प्रकारानंतर याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

अहवालांचा गोंधळ चव्हाट्यावर; किशोर दराडेंची चौकशीची मागणी 

या प्रकारामुळे कोरोना अहवाल अन्‌ उपचाराचे बाजारीकरण पुन्हा चर्चेत आले. नांदगाव येथे सरपंच नियुक्तीच्या निमित्ताने नातेवाइकांसह तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या संपर्कात आल्याने आमदार नरेंद्र दराडे यांनी पुणे येथील खासगी लॅबमध्ये तपासणी केली. अहवाल पॉझिटिव्ह निघाल्याने ते मुंबईतील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. मात्र, लक्षणे नसल्याने तेथे उपचारापूर्वी घेतलेल्या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. दराडे यांचे बंधू, सुना, नातवंडे, मुली, जावई असे एकूण ३० ते ३५ जणांचे कुटुंब असून, संपर्कात आल्याने आमदार किशोर दराडे यांच्यासह २२ जणांचे स्वॅब येथील आरोग्य विभागाने रविवारी (ता. १९) घेतले. याचा अहवाल नाशिकच्या शासकीय लॅबमधून मंगळवारी (ता. २१) सायंकाळी आला. त्यात २२ पैकी नऊ अहवाल पॉझिटिव्ह आले. संपर्कातील अनेकजण निगेटिव्ह आल्याने व कुणालाही लक्षणे नसल्याने सर्वांची खासगी लॅबमध्ये तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मुंबईतील एका लॅबचे पथक येवल्यात बोलावून, बुधवारी या नऊ जणांचे स्वॅब घेतले. त्यांचे अहवाल गुरुवारी (ता.२३) निगेटिव्ह आले. 

अगोदर पॉझिटिव्ह आलेले निम्मे कुटुंब, नंतर मात्र निगेटिव्ह

अगोदर पॉझिटिव्ह आलेले निम्मे कुटुंब, नंतर मात्र निगेटिव्ह आल्याने सर्वांनाच मनस्ताप सहन करावा लागला. विशेषत: सर्वसामान्य नव्हे, तर दोन आमदार असलेल्या येथील दराडे कुटुंबीयांच्याच बाबतीत हा प्रकार घडला. दरम्यान, या गंभीर प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार किशोर दराडे यांनी गुरुवारी (ता.२३) पत्रकार परिषदेत केली. 

गोंधळाची चौकशी करा : दराडे 
पॉझिटिव्ह-निगेटिव्हचा हा गोंधळ सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळणारा आहे. अनेकजण निगेटिव्ह असताना उपचार घेत असतील, तर ही बाब गंभीर आहे. लॅबच्या या हलगर्जीची चौकशी करावी, अनेक हॉस्पिटल विमा पॉलिसी असलेल्यांना उपचारास खाटा उपलब्ध नसल्याचे कारण देत दाखल करून घेत नाही. ‘कॅश असेल तर बेड’ अशी स्थिती असून, यावर नियंत्रण आणावे व हा सावळा गोंधळ थांबण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असून, शुक्रवारी नाशिक येथे शरद पवार व आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनाही निवेदन देणार असल्याचे श्री. दराडे यांनी सांगितले. 

असे केले नसते तर आजही आम्ही कोविडचे उपचार घेत असतो

माझ्या कुटुंबात घडलेला हा प्रकार गंभीर आहे. लक्षणे नसल्याने आम्ही वेळीच ‘सेकंड ओपिनियन’ म्हणून दुसऱ्यांदा तपासणी केली. असे केले नसते तर आजही आम्ही कोविडचे उपचार घेत असतो. रुग्णांच्या भावनांसह जिवाशी खेळण्याचा हा प्रकार असून, आरोग्य यंत्रणेने अशी हलगर्जी कुणाच्याही बाबतीत करू नये. यासंदर्भात उपाययोजनेची मागणी आम्ही करणार आहोत. - नरेंद्र दराडे, आमदार 

संपादन - ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा भाजपवर आरोप; “मतचोरीच्या मुद्द्यावरून माघार घेणार नाही”

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT