Half bridged collapsed latest marathi news esakal
नाशिक

ओझरखेड-वरखेडा रस्त्यावरील अर्धा पुलच गेला वाहून; शेतकरी व विद्यार्थ्यांचे हाल

दिगंबर पाटोळे, सकाळ वृत्तसेवा

वणी (जि. नाशिक) : ओझरखेड - वरखेडा रस्त्यावरील ओझरखेड शिवारात उनंदा नदीवर असलेला पुल (Bridge) वाहून गेला असून ओझरखेड शिवारातील शेतकरी व ग्रामस्थांचे दळणवळण ठप्प झाले असून शेतकरी व विद्यार्थ्यांंचे हाल होत आहे. (Half of bridge on Ozarkhed Varkheda road was washed away nashik Latest Marathi news)

गेल्या दहा ते बारा दिवसांपासून दिंडोरी तालुक्यात संततधार पाऊस होत असल्याने अनेक ठिकाणच्या नद्या, नाल्यांना पूर आल्याने अनेक नुकसान यादी समोर येत आहे. त्यात अतिमहत्त्वाचा रस्ता म्हणजे ओझरखेड ते वरखेडा येथील पूल वाहून गेल्याने दोन्ही गावांचा जाण्या-येण्याचा संपर्क तुटल्याने प्रवासी वर्गाची मोठी कुचंबणा होत आहे.

ओझरखेड धरण ओव्हरफ्लो झाल्याने धरणाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग उनंदा नदीत होत असल्याने या नदीवर कमी उंचीचा असलेला ह्या पुलाचा अर्धा भाग पाण्याच्या वेगाने वाहून गेला आहे. वरखेडा, ओझरखेड शिवारात असलेले शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना वणीकडे किंवा ओझरखेड गावात येण्यासाठी तसेच वणी, ओझरखेड गांव बाजूने वरखेडा येथे जाण्याचा जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावरुन वाहनांची मोठी वर्दळ असते.

परंतु सध्या संततधार पावसाने येथील पूल वाहून गेल्याने विद्यार्थी, नागरिक, प्रवासी, शेतकऱ्यांना येथून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी बांधलेला पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यानेच हा पुल वाहून गेल्याचा आरोप ओझरखेडचे सरपंच गंगाधर निखाडे व ग्रामस्थांनी केला असून शेतकरी, विद्यार्थ्यांची होत असलेले हाल, गैरसोय लक्षात घेवून शासनाने नव्याने अधिक उंचीचा असलेला पुल बांधून द्यावा अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT