Hall tickets 10th class will be available tomorrow Board of Education information sakal
नाशिक

दहावीचे हॉल तिकीट उद्या होणार उपलब्‍ध

शिक्षण मंडळाची माहिती; शाळांकडून विद्यार्थ्यांना वितरण

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मार्च-एप्रिल २०२२ मध्ये होणाऱ्या दहावीच्‍या परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) विद्यार्थ्यांना लवकरच उपलब्‍ध होणार आहेत. शुक्रवारी (ता. १८) शिक्षण मंडळामार्फत शाळांच्‍या लॉगइनवर प्रवेशपत्र उपलब्‍ध करून दिले जातील. त्‍यानंतर त्‍याची प्रिंट काढत शाळांकडून विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रांचे वितरण केले जाईल.

दहावीच्या परीक्षेसाठी सर्व विभागीय मंडळांतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशपत्र (हॉल तिकीट) उपलब्‍ध करून दिले जात आहे. माध्यमिक शाळांना दहावीच्‍या परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्‍या www.mahahsscboard.in या संकेतस्‍थळावर शुक्रवारी दुपारी एकपासून उपलब्‍ध होतील. स्कूल लॉगइनमध्ये जाऊन प्रवेशपत्र डाउनलोड करता येतील. यासंदर्भात काही तांत्रिक अडचण उद्‌भवल्‍यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

अशी असेल प्रक्रिया...

शाळांनी हे प्रवेशपत्र प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत. या प्रिंटसाठी विद्यार्थ्यांकडून कुठलेही शुल्‍क आकारले जाणार नाही. प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्‍यावर मुख्याध्यापकांनी शिक्‍का मारून स्‍वाक्षरी करायची आहे. प्रवेशपत्रात विषय व माध्यम बदल असल्‍यास, त्‍यांच्‍या दुरुस्‍त्‍या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करायच्‍या आहेत. फोटो, स्‍वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव, जन्‍मतारीख व जन्‍मस्थळ यासंदर्भातील दुरुस्‍त्‍या शाळांनी त्‍यांच्‍या स्‍तरावर करून त्‍याची प्रत विभागीय मंडळाकडे पाठवायची आहे. प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्‍यास संबंधित शाळांनी पुन्‍हा प्रिंट काढत त्‍यावर लाल शाईने द्वितीय प्रत (डुप्लिकेट) असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र द्यायचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT