Hanuman Chalisa
Hanuman Chalisa esakal
नाशिक

Hanuman Jayanti : भगवान हनुमंताचे आयुवर्देतील संदर्भ माहितीये का?

सकाळ वृत्तसेवा

श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त भगवान हनुमंत यांचे शारीरिक व मानसिक दुःख निवारणाच्या संदर्भात आयुर्वेद चिकित्साशास्त्र व आध्यात्मिक दृष्टीने आलेले संदर्भ जाणून घेण्यासाठी आजचा लेखनप्रपंच.. - डॉ. शशिकांत कापडणीस, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, सटाणा

(hanuman jayanti special article by Dr Shashikant Kapadnis nashik news)

वायुपुत्र : हनुमानजी पवनपुत्र म्हणजेच वायूचे पुत्र असून, हनुमंतावर वायू महाभुताचा प्रभाव आहे. आयुर्वेदात पंचमहाभुतांपैकी वायूला खूप महत्त्व असून, त्याचे प्रचंड असे सामर्थ्य आहे. या वायू तत्त्वामुळेच शरीरातील सर्व क्रिया घडत असतात. परंतु शरीराला उपकारक ठरण्यासाठी वायूला साम्यावस्थेत ठेवावे लागते.

“नास्ति तैलात परम् किंचिदौषधम् मारुतापहं।’’

म्हणजेच वातावर नियंत्रण ठेवण्यासाठी तेल हे श्रेष्ठ औषध आहे. आयुर्वेदात यासाठीच नियमित तेलाचा अभ्यंग (मालिश) करायला सांगितले आहे. यामुळे शरीर बलवान/वज्रवत बनते. स्थिर, बलवान शरीर व मनाची एकाग्रता, धैर्याची कामना करून मारुतीला तेल वाहून त्याची पूजा केली जाते.

मकरध्वज : रामायणात संदर्भ येतो, की हनुमानजी माता सीतेच्या शोधात लंकेला जात असताना त्यांच्या शरीरावरील निथळलेला घामाचा थेंब समुद्रातील मगरीच्या मुखात पडल्याने तिने तो प्राशन केला. त्यापासून जन्माला आलेल्या हनुमंताच्या पुत्राचे नाव ‘मकरध्वज’ असे होते.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

मकरध्वजाने अहिरावण व महिरावण या राक्षसांना पराभूत केले होते. आयुर्वेदात ‘मकरध्वज’ नावाचे औषध रसशास्त्रात सांगितले असून, वैवाहिक सौख्य (पौरुष्य) साठी हे बेजोड औषध आहे. हनुमंताच्या पौरुषत्वाचे वर्णनच या कथेतून मांडले आहे.

संजीवनी : राम-रावणाच्या युद्धाच्या वेळी मेघनादच्या अस्त्राने लक्ष्मणजी मूर्च्छित पडले असताना त्यांच्या उपचारासाठी सुषेन वैद्यांना हनुमानजींनी लंकेहून आणले होते. त्या वेळी संजीवनी बुटीच्या शोधात हनुमानजी हिमालयात गेले असता त्यांना तेथील सर्वच वनस्पती चमकताना दिसल्यामुळे ते आख्खा पर्वतच उचलून आणतात.

याविषयी असा उल्लेख आहे, की राक्षसांच्या मायावी शक्तीमुळे (संभ्रम निर्माण करण्यासाठी) सर्व वनस्पती चमकत होत्या. परंतु काही जाणकार वैद्यांमध्ये अशी मान्यता आहे, की हनुमानजींच्या दृष्टीत सर्वच वनस्पती या संजीवनी असल्यामुळे त्यांना चमकताना दिसत होत्या, असे म्हटलेच आहे की-जगत् एवम् औषधं। म्हणजेच या सृष्टीतील सर्वच वनस्पती औषधी आहेत. मात्र असेही म्हटले आहे, की योजकस्तत्र दुर्लभः। म्हणजेच त्या वनस्पतीची संजीवनी सारखी योजना करू शकणारे (वैद्य) मात्र दुर्लभ आहेत.

सुंठवडा : हनुमान जयंती/रामनवमीला ‘सुंठवडा’ प्रसाद म्हणून वाटला जातो. यात सूंठ, साखर, धने व खोबरे असते. यादरम्यान पित्त वाढत असल्याने सुंठवडा पित्तविकारासाठी व वातनाशक म्हणून कंबरदुखी, आमवात, संधिवात कमी करण्यासाठी उपयुक्त असते. सूंठवात, कफ कमी करतेच, त्याबरोबर पचनही सुधारते व पौरुषशक्तीही वाढवते.

हनुमानबाहुक :

“हनुमन्नञ्जनीसूतो वायुपुत्र महाबल ।

अकस्मादागतोत्पातं नाशयाशु नमोऽस्तु ते ।।”

गोस्वामी तुलसीदासजींनी त्यांच्या बाहुंमधील वाताच्या भयंकर वेदनांपासून मुक्ती मिळविण्यासाठी हनुमानबाहुकची रचना केली. अशी मान्यता आहे, की वाताच्या दुर्धर वेदनांपासून मुक्तीसाठी औषधी सेवनाबरोबरच ‘हनुमानबाहुक’चा पाठ करावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT