Har Ghar Tiranga Campaign esakal
नाशिक

Har Ghar Tiranga Campaign: शिक्षण विभागाने घातला ध्वजवंदनचा घोळ!

काही शाळांत तीन दिवस, तर काहींमध्ये स्‍वातंत्र्यदिनीच ध्वजवंदन

सकाळ वृत्तसेवा

Har Ghar Tiranga : ‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेत शाळांच्‍या सहभागाबाबत शिक्षण विभागाच्या परिपत्रकाने गोंधळ उडाला आहे. शाळांनी आपपाल्या परीने अर्थ लावत कुठे तीन दिवस, तर कुठे फक्त स्वातंत्र्यदिनीच ध्वजवंदन करण्यात येईल, असे रविवारी (ता. १३) बघायला मिळाले.

एकाच दिवशी ठराविक अंतराच्‍या फरकाने ध्वजवंदनाबाबत जारी केलेल्‍या दोन सूचनापत्रांमुळे हा गोंधळ निर्माण झाला आहे. (Har Ghar Tiranga Campaign ZP education department made mess of flag waving nashik)

देशाचा स्‍वातंत्र्य दिन साजरा होत असताना ‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेंतर्गत रविवार (ता. १३)पासून स्‍वातंत्र्य दिनाच्‍या दिवसापर्यंत असे तीन दिवस ध्वजवंदन केले जात आहे. त्‍यानुसार शासकीय कार्यालये व आस्‍थापनांमध्ये रविवारी ध्वजवंदन करण्यात आले.

शाळांनाही या मोहिमेत सहभागी होण्याचे सूचनापत्र जिल्‍हा परीषदेच्‍या शिक्षण विभागाने जारी केले. शैक्षणिक संस्‍थांच्‍या पातळीवरून शाळांना हे पत्र पाठवत कार्यक्रमात सहभागी होण्याच्‍या सूचना केल्‍या होत्‍या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शिक्षण विभागाने पत्र जारी केल्‍याच्‍या अवघ्या काही तासांत सुधारित परिपत्रक काढले. केवळ स्‍वतंत्र्यदिनीच ध्वजवंदन करण्याच्‍या सूचना या सुधारित सूचनापत्रात देण्यात आल्‍या आहेत. मात्र सुधारित आदेश प्राप्त न झालेल्‍या शाळांनी रविवारी ध्वजवंदन केल्‍याचे चित्र शहरासह जिल्‍हाभरातील काही शाळांमध्ये बघायला मिळाले.

आता या शाळांकडून एकूण तीन दिवस ध्वजवंदन केले जाणार आहे. सुधारित सूचनापत्र वेळीच प्राप्त झालेल्‍या शाळांकडून केवळ स्‍वातंत्र्यदिनीच ध्वजवंदन कार्यक्रम घेण्याचे नियोजन आखले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT