woman harrasment  esakal
नाशिक

भावाला नोकरी लावण्याच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग | Nashik

विनोद बेदरकर

नाशिक : भावाला नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच, यात फसवणूक होत असल्याचे माहिती असूनही इतर सहा जणांनी कट रचून महिलेची फसवणूक करीत तिचा विनयभंग करणाऱ्याला मदत केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

तक्रार मागे घेण्यासाठी तिला दमदाटी

नितीन सखाराम पाटील (५४), अलका नितीन पाटील (४९, ता. तळोदा, जि. नंदुरबार), सतीष भगवान पाटील (५७,) सुवर्णा सतीश पाटील (५१, प्रकाशा शहादा), छोटुलाल दामू पाटील (५०, परिवर्धा, ता. शहादा), वसंत पाटील वेलदा (ता. निजर, जि. तापी), वंदना रामदास तोरवणे (तळोदा, जि. नंदुरबार), अशी संशयितांची नावे आहेत. महिलेच्या तक्रारीनुसार संशयितांनी सहा महिने कट रचून फसवणूक करीत त्र्यंबकेश्वर, नाशिक रोड, इंदिरानगर आणि मुंबई नाका या भागात विश्वासघात करीत फसवणूक व विनयभंग केला.

नितीन पाटील याने महिलेच्या अगतिकतेचा गैरफायदा घेत तिच्या भावाला चांगली नोकरी लावून देण्यासह तिच्याशी विवाह करण्याच्या बहाण्याने तिचा विनयभंग केला. पोलिस आयुक्तांकडे दिलेला तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी तिला दमदाटी केली, असे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT