CM Eknath Shinde Group News  esakal
नाशिक

Cm Eknath Shinde Group : हर्षदा गायकर, संदीप गायकर यांच्यासह पदाधिकारी शिंदे गटात

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शिवसेनेच्या नाशिकमधील बालेकिल्ल्याला मंगळवारी (ता. १५) पुन्हा झटका बसला. शिवसेनेच्या युवती सेनेच्या प्रमुख माजी नगरसेविका हर्षदा गायकर व संदीप गायकर यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

राऊत ज्या वेळी नाशिकमध्ये येतात. त्या वेळी शिंदे गटाकडून राऊत यांना डिवचण्यासाठी करेक्ट कार्यक्रम केला जात असल्याची चर्चा आहे. (Harshada Gaikar Sandeep Gaikar along with office bearers in Cm Eknath Shinde Group nashik news)

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

मागील आठवड्यात आदित्य ठाकरे यांनी नाशिक दौरा केला. त्यापाठोपाठ आता खासदार राऊत यांनी उपनेते सुनील बागूल यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून नाशिकमध्ये आले. यापूर्वी राऊत ज्या-ज्या वेळी नाशिकमध्ये आले, त्यावेळी शिंदे गटात प्रवेश झाले आहेत.

राऊत हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी येतात, असे म्हटले जात असले तरी त्याच्या उलट कृती होत असल्याचे दिसून येत आहे. गायकर यांच्यासह शिवसेना महिला आघाडीच्या कावेरी अत्रे, आरती कांगुणे, वैशाली मंडलिक, उमा चव्हाण, युवती सेना कार्यकारिणीच्या प्राची पवार,

हर्षदा दिवटे, शीतल भंवर, ऐश्वर्या कुत्तेकर, नेहा गायकर, अनुजा चव्हाण, स्वरूपा राऊत, स्नेहा शिरसाट, योगिता कुत्तेकर, साक्षी बोरसे, कल्याण लोहकरे यांनी प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रवेश सोहळ्यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र व्यासपीठावर दाखल

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT