Staff during biometric registration of unregistered hawkers at West Divisional Office esakal
नाशिक

NMC Hawkers Registration : बायोमेट्रिक नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : हॉकर्स झोनमधील नोंदणी न झालेल्या फेरीवाल्यांची नोंदणी पश्चिम विभागीय कार्यालयात गेली दोन दिवस करण्यात आली. त्यात फेरीवाल्यांचा नोंदणीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंगळवारी (ता. २३) मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने उशिरापर्यंत नोंदणी सुरू होती. महापालिकेकडे अद्याप नोंदणी न झालेल्या फेरीवाल्यांची सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी नोंदणी करून घेण्याची विशेष मोहीम राबविण्यात आली. (Hawkers Spontaneous Response to NMC Biometric Registration nashik latest marathi news)

पश्चिम विभागातील हॉकर्स झोनमधील नोंदणी न झालेल्या फेरीवाल्यांचा या दोन्ही दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशी पश्चिम विभागीय कार्यालयात नोंदणीसाठी गर्दी होती.

मंगळवारी उशिरापर्यंत राष्ट्रीय फेरीवाला झोनचे राजेंद्र भोरकडे, पश्चिम विभागाच्या जाहिरात व परवाना विभागाचे सहाय्यक अधीक्षक राजू वाघ, मनोज पवार तसेच कर्मचाऱ्यांकडून सर्वांची बायोमेट्रिक नोंदणी करून घेतली.

शहरातून सुमारे पंधराशे फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक नोंदणी करण्याचे लक्ष्य देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान भद्रकाली परिसरातील काळिमा समजला जाणारा परिसर अर्थात जुने टॅक्सी स्टँड, व्हिडिओ गल्ली या भागांची ओळख बदलून याठिकाणी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने परिसरातील सामाजिक कार्यकर्ते चेतन शेलार आणि नीलेश शेलार यांनी महापालिकेस पाठपुरावा करून याठिकाणी सेंट्रल मार्केट निर्माण केले.

त्याठिकाणीही हॉकर्स झोन करण्यात आले असून येथील फेरीवाल्यांची देखील बायोमेट्रिक नोंदणी करण्यात आली. मार्केटची निर्माण करण्यासाठी माजी सभापती तसेच नगरसेविका वत्सला खैरे यांचेही सहकार्य लाभले.

येत्या काही दिवसात रस्त्यावर फेरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन जागेची निश्चिती करून त्या ठिकाणीही हॉकर्स झोन निर्माण करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी अधिकृत रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी उर्वरित फेरीवाल्यांची नोंदणी करण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT