LOVE STORY NEWS esakal
नाशिक

प्रेयसीला घेऊन त्र्यंबकेश्वरच्या श्रावण फेरीला गेला अन् प्रकरणाच्या फेरीत अडकला

बायको व मुलांच्या धाकाने दोन दिवसांपासून हा अवलिया घरीच आला नसल्याची घटना सातपूरला समोर आली आहे.

सतिश निकुंभ

सातपूर : तिसऱ्या सोमवारी मैत्रिणी सोबत त्र्यंबकला फेरी मारायला गेलेल्या प्रियकराला आपल्याच मुलाने रंगेहात पकडल्यामुळे त्या प्रेमीयुगुलाचा ऐकच गोंधळ उडाल्याची घटना समोर आली. बायको व मुलांच्या धाकाने दोन दिवसांपासून हा अवलिया घरीच आला नसल्याची घटना सातपूरला समोर आली आहे. (Latest Marathi News)

सुखाने भरलेला परिवार असला तरी शारीरिक समाधानासाठी पतीने कामाच्या ठिकाणी असलेल्या दुसऱ्या बाई बरोबर प्रेमप्रकरण केले. याबाबतची कुणकूण त्याच्या घरी दबक्या आवाजात आली होती. पण मुला, बाळाचा विचार करून थेट पतीशी बोलण्यास पत्नी टाळत होती. बायको काहीच बोलत नाही म्हटल्यावर प्रेमवीर भाऊ अधिकच फॉर्मात आले होते. संधीचा गैरफायदा घेत हा प्रेमवीर दिवसातील जास्तीत- जास्त वेळ आपल्या प्रेयसीकडे घालवू लागला. अशातच श्रावण सुरू झाला आणि हा प्रेमवीर प्रेयसी बरोबर तिसऱ्या श्रावण सोमवारी त्र्यंबकला फिरायला गेला खरा पण याच गर्दीत आपल्याच मुलांच्या नजरेस पडल्याने दोघांचा एकच गोधळ उडाला.

जे नको व्हायला तेच घडल्याने घरी हे प्रकरण माहिती होईल या भीतीने प्रेयसीला गर्दीत सोडून हा भाऊ तेथूनच फरार झाला. गेल्या दोन दिवसांपासून हा अवलिया घरीच आला नसल्याने प्रेयसीने नवरा पळवल्याची खंत व्यक्त करत पती बेपत्ता झाल्याची तक्रार सातपूर पोलिसात पत्नीने दिल्याचे पाहायला मिळाले. यामुळे प्रेयसीला घेऊन फेरीला गेला पण प्रेमप्रकरणाच्या फेरीत अडकला, अशीच चर्चा सातपूरमध्ये रंगू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MCOCA: पुण्यात विषारी दारूमुळे २१ जणांचा बळी घेणाऱ्या टोळीवर ‘मकोका’; राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

ती सगळ्यांसमोर पाणउतारा करायची... अशोक शिंदेनी सांगितलं सेटवर कशा वागायच्या अलका कुबल; पहाटे साडे पाचला...

Latest Marathi News Live Update : बिहारचे मंत्री दीपक प्रकाश हे विधान परिषदेचे सदस्य बनले

Pune Traffic: सिंहगड रस्त्यावरील कोंडीवर उपाययोजना : महापौरांचा १५ दिवसांत वाहतूक सुधारणा आराखडा तयार करण्याचा आदेश

Pune Investment Scam: ८८ कोटींची फसवणूक करून यूएईत पळालेली महिला गुंतवणूकदार ठग पुण्यात प्रत्यार्पणातून पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT