image.jpg 
नाशिक

'लघुशंका' करणाऱ्यांना हटकल्याचा राग आल्याने...त्यांनी बळजबरीने घरात घुसून

सकाळवृत्तसेवा

नाशिक : बंगल्याच्या भिंतीलगत लघुशंका करणाऱ्यांना हटकल्याचा राग आल्याने संशयितांनी फुलेनगरमधून लाठ्याकाठ्या घेऊन टोळके आणले आणि बंगल्यात घुसून धिंगाणा घालत शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला. दरम्यान, एकीकडे पोलिस आयुक्ता लयाकडून टवाळखोरांविरोधात कारवाई केली जात असल्याचे सांगण्यात येत असले तरी, दुसरीकडे टोळक्‍यांकडून होणारी लुटमार, हाणामारीच्या घटना सातत्याने घडत असल्याने नागरिकांमध्ये नवनवीन भाईगिरींकडून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

अशी आहे घटना

पंचवटीतील दत्तनगरमध्ये किशोर दत्तू फडे यांचा बंगला आहे. गेल्या शनिवारी (ता.29) दुपारी चार वाजेच्या सुमारास एक संशयित लघुशंका करण्यासाठी त्यांच्या बंगल्याच्या भिंतीजवळ आला असता त्यास हटकले. त्याचा राग धरून संशयित माघारी गेला परंतु जरा वेळाने संशयित गोविंदा सुनील ठाकरे (24, रा.कबुतर खाना, फुलेनगर, पेठरोड पंचवटी), रवी हिरामण भगरे (18, रा. दत्तनगर, फुलेनगर), प्रवीण विजय ठाकरे (20, रा. विजय चौक, फुलेनगर) हे हातामध्ये लाठ्याकाठ्या घेऊन परत आले. संशयितांनी बंगल्यामध्ये बळजबरीने घुसून किशोर फडे, त्यांचे शालक शेखर बोडके यांना शिवीगाळ केली. तसेच बंगल्याच्या आवारात धिंगाणा घालत दहशत पसरविली. एवढेच नव्हे तर आम्ही या एरियाचे भाई असून कोणाला घाबरत नाही. आमच्या विरोधात तक्रार केली तर सोडणार नाही अशी धमकी देत परिसरात दहशत पसरविली. तसेच, पोलिसात गेला तर राहणे मुश्‍किल करू अशी धमकी देत, बंगल्याच्या गेटवर लावलेले डिजीटल फलकाचे नुकसान केले. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा > घरी येणार होता छोटासा पाहुणा...पण, काळ असा आला की सगळं हिरावून नेलं...
 
दरम्यान, टवाळखोरांविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू असतानाही भाईगिरी करीत परिसरामध्ये दहशत पसरविण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. त्यातच लहान-मोठ्या गुन्हेगारी टोळ्यांमध्येही गॅंगवारचा भडका उडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. नाशिकरोडच्या फर्नांडिसवाडीत अशा प्रकारातून सराईत गुन्हेगाराचा खून झाला आहे. त्यामुळे शहरात दहशतीचा वातावरण निर्माण करणाऱ्यावर कारवाईची मागणी होते आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT