नाईक शिक्षण संस्थेची वार्षिक  sakal
नाशिक

नाशिक : मुख्याध्यापक, शिक्षकांना शिस्त लावा; सभासद आक्रमक

नाईक शिक्षण संस्थेची वार्षिक ऑनलाइन सभा वादळी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दीड वर्षापासून कोरोनाच्या नावाखाली सर्व थकून गेले. अनेक अडचणीही आल्या. आता कोविडच्या नावाखाली लपू नका, संस्थेच्या गुणात्मक विकासाकडे लक्ष द्या, स्वीकृत सदस्यांबाबत योग्य निर्णय घ्या, मृत सभासदांच्या वारसांना सभासदत्व द्या, मुख्याध्यापक, शिक्षकांना शिस्त लावा, अशा अनेकविध मागण्यांसाठी क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे सभासद आक्रमक झाले होते.

क्रांतिवीर नाईक शिक्षणप्रसारक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (ता. १९) ऑनलाइन झाली. संस्थाध्यक्ष पंढरीनाथ थोरे अध्यक्षस्थानी होते. शासनाचे आदेश व जिल्हाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार संस्थेच्या सभासदांनी संस्थेकडे दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर आणि ई-मेलवर सभेपूर्वी अर्धा तास अगोदर सभासदांना मीटिंगची लिंक पाठविली. उमराळे येथील ज्येष्ठ सभासद जे. डी. केदार यांनी सिन्नरला आडवा फाटा येथे मोक्याच्या ठिकाणी जागा असूनही त्याठिकाणी संस्थेचा एक संचालक अडचण निर्माण करीत आहे. त्यांना तुम्ही सर्व पदाधिकारी, विश्वस्त व संचालक अशा २९ जणांनी विरोध करण्याची गरज आहे.

२९ जणांचे मंडळ असताना, दोन स्वीकृत सदस्य घेण्याची गरज नाही. या उलट आहे ती संख्या कमी करा. जिल्ह्यांतील महत्त्वाच्या तालुक्याच्या ठिकाणी दुसऱ्या संस्थांचा मोठा विकास झाला आहे आणि आपली संस्था काय करत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यावर अध्यक्ष थोरे यांनी याबाबत सर्वानुमते धोरणात्मक निर्णय घेऊ, असे सांगितले. संस्थेचे निवृत्त मुख्याध्यापक सुरेश ताडगे यांनी काही ठिकाणच्या मुख्याध्यापकांच्या कामकाजाबद्दल पदाधिकऱ्यांकडे तक्रार करूनही काहीच कार्यवाही झाली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यावर श्री. थोरे यांनी आता मुख्याध्यापकांसह शिक्षक, क्लार्क यांचीही परीक्षा घेण्यात येईल. त्यात गुणवत्ता नसलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

उपाध्यक्ष पी. आर. गिते, सहचिटणीस तानाजी जायभावे, विश्वस्त दिगंबर गिते, दामोदर मानकर, बाळासाहेब वाघ, संचालक विलास आव्हाड, सुरेश घुगे, मंगेश नागरे, अशोक भाबड, श्याम बोडके, तुळशीराम विंचू, जगदीश बोडके, नयना आव्हाड, मोहन चकोर, राजेंद्र सांगळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT