The primary school building in Pimpalsond, Dagpadada, a village near the Gujarat border, has fallen into disrepair. water crisi for drinking water for twelve months. esakal
नाशिक

Nashik News: आरोग्यसेवा वाऱ्यावर, शिक्षणाचा बोजवारा; रस्त्याचे विघ्न दूर करण्यासाठी आदिवासींचा आक्रोश

सकाळ वृत्तसेवा

विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गुजरातच्या सीमावर्ती भागातील सुरगाणा तालुक्यातील ५५ हून अधिक आदिवासी गावे, वाडे, वस्त्यांवरील रस्ता, विजेचा प्रश्न गंभीर झालेला असून, या गावांमधील आरोग्यसेवाही वाऱ्यावर आहे. शिक्षणाच्या सुविधांचीही वानवाच आहे. रस्ते नसल्याने आरोग्यसेवा पोचलेली नाही, आहे ती सेवाही ग्रामस्थांना मिळत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना आरोग्यसेवेसाठी गुजरात गाठावे लागते. हीच बाब शिक्षणाचीही आहे. गावात शिक्षणाची व्यवस्था आहे. मात्र, यात पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. शासकीय आश्रमशाळांचे प्रश्नही मोठे आहेत. त्यामुळे आरोग्य व शिक्षण या मूलभूत सुविधांपासून ही गावे कोसो दूर आहेत. (Health Care Winds Up Education Bursts Tribals cry for removal of road obstruction villages in surgana taluka Nashik Latest Marathi News)

येथील प्राथमिक शाळा.

गुजरातच्या लगत आणि तालुक्यातील शेवटचे गुजरात सीमेवर असलेले आणि सातशे लोकसंख्या असलेले पिंपळसोंड (दगडपाडा) गाव. तेथे रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. पावसाळ्यात तर या गावातून तालुक्याला जाणारा रस्ता पाण्याखाली जातो. त्यामुळे ग्रामस्थांना पावसाळ्यात उपचारासाठी सीमेलगत असलेल्या डांग जिल्ह्यातील वासंदा गाठावे लागते. रानजुणे, करवळपाडा येथे जाण्यासाठी रस्त्याची सोय नसल्याकारणाने पावसाळ्यात या गावांमधील रुग्णांना डोलीतून पांगारणे येथे आणावे लागते.

येथील आरोग्य केंद्रात उपचार मिळाला तर ठीक, अन्यथा येथून वासदा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करावे लागते. इतर गावांतील रुग्णास उपचारासाठी सुरगाणा आरोग्य केंद्रात दाखल केल्यास तेथून त्यांना नाशिकला रेफर केले जाते. यंत्रणांचा हा अनुभव नागरिकांना निराश करणारा ठरतो. काही गावांमध्ये आरोग्य केंद्र इमारती आहेत; मात्र येथे डॉक्टरच उपस्थित नसतात. स्टाफ राहात नसल्याच्या तक्रारी आहेत.

हेही वाचा : Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

रस्ते नाहीत म्हणून बस नाही

आरोग्यापाठोपाठ शिक्षणव्यवस्था देखील या गावांमध्ये नाही. जिल्हा परिषदांच्या शाळा येथे आहेत. मात्र, पुरेसे शिक्षक नसणे, इमारती जीर्ण झालेल्या असल्याने शाळा मोडकळीस आलेल्या दिसून आल्या. अनेक गावांमध्ये पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षणाची व्यवस्था. पुढील शिक्षणासाठी गावे सोडून मोठ्या गावांमध्ये जावे लागते. मात्र, त्यासाठी रस्त्यांची व्यवस्था नाही. काही गावांमध्ये रस्त्यांची दयनीय व्यवस्थेमुळे गावात एसटी बस येत नाही. त्यामुळे मुलांना शिक्षणासाठी जाता येत नाही. पर्यायाने, शिक्षण अर्धवट सोडावे लागते.

"शासनाची १०८ रुग्णवाहिका रस्त्यांअभावी गावात येत नाही. याउलट वासदा, धरमपूर येथील १०८ ला फोन केल्यास तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध होते. गावातील आरोग्य केंद्रात उपचारासाठी आवश्यक साधनसामग्री नसते. त्यामुळे नाइलाजास्तव डांग, वासदा येथे उपचारासाठी जावे लागते." - गंगू महाले, ग्रामस्थ, लहान तळपाडा

"प्रसूतीसाठी कधीही रुग्णवाहिका मिळत नाही. सुरगाणा येथे गेल्यास थेट नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविले जाते. नाशिकला जाणे शक्य नसल्याने आम्ही वासंदा येथे प्रसूतीसाठी जातो." - सुनीता धेंडा वाघ, ग्रामस्थ, केळीपाडा सुरगाणा

"पावसाळ्यात रस्ते पाण्याखाली जातात. त्यामुळे गावात वाहतूकव्यवस्था विस्कळित होते. आम्हाला रुग्णांना डोलीतून रुग्णालयापर्यंत पोचवावे लागते. जवळ आरोग्यसेवा नसल्याने नाइलाजाने गुजरातमध्ये जाण्याची वेळ येते."
- नंदा रमेश बागूल, ग्रामस्थ, पिंपळसोंड सुरगाणा

"गावांमध्ये माध्यमिक व उच्च शिक्षणासाठी आवश्यक सुविधा नाहीत. शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षणाची पुरेशी व्यवस्था नाही. त्यामुळे शेजारील गुजरातमध्ये जाऊन शिक्षणाचे धडे गिरवावे लागतात." - राजेंद्र थोरात, युवक, खुंटविहीर, सुरगाणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FIFA World Cup 2026 : मेस्सी विरुद्ध रोनाल्डो QF मध्ये भिडणार; वर्ल्ड कप २०२६ चे गट जाहीर, डोनाल्ड ट्रम्प यांना 'शांतता' पुरस्कार

MPSC Exams 2026: एमपीएससी 2026 वेळापत्रक जाहीर; राज्यसेवा, वनसेवा, गट-ब–क परीक्षांचे दिनांक स्पष्ट

Panchang 6 December 2025: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

क्रिकेटप्रेमींसाठी ६ डिसेंबर आहे खास...आज एक दोन नव्हे तर तब्बल ११ क्रिकेटपटूंचा वाढदिवस 'Birthday Special-11' एकदा वाचाच...

DK शिवकुमार-जारकीहोळी भेटीमागचे राजकारण गडद; सत्तावाटपावरून काँग्रेसमध्ये जोरदार हालचाली, संक्रातीपर्यंत निर्णय होणार?

SCROLL FOR NEXT