Robots1 
नाशिक

रोबोट करणार आरोग्य तपासणी? कोरोना लढाईसाठी रेल्वे पथक सज्ज

सकाळवृत्तसेवा

नाशिक / नाशिक रोड : मध्य रेल्वे वैद्यकीय पथकातर्फे कोविड आणि नॉन कोविड रुग्णांना हाताळण्यासाठी पायाभूत सुविधा, डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफचे कठोर प्रशिक्षण सुरू आहे. कोटनीस मेमोरिअल रेल्वे हॉस्पिटल, सोलापूर येथे वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी एक अभिनव वैद्यकीय सहाय्यक (आरओ) बीओटी बनविला आहे. तसाच भुसावळ विभागातील रेल्वेच्या निवडक हॉस्पिटलमध्ये रोबोट बसविला जाणार असल्याची माहिती रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने दिली. 

काय वैशिष्टे आहेत...वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात...
हा रोबोट तापमान, ऑक्सिजन संपृक्तता दूरस्थपणे मोजण्यासाठी आणि रुग्ण व डॉक्टरांशी द्विमार्ग व्हिडिओ संप्रेषणाद्वारे स्वयंचलितपणे सॅनिटायझर वितरणासाठी वापरला जातो. रिमोट ऑपरेशनद्वारे त्यांना अन्न, औषधे पुरविण्यासाठीदेखील याचा वापर केला जातो. सध्या डॉक्टर, नर्स व वैद्यकीय कर्मचारी हाय रिस्क झोनमध्ये काम करत आहेत म्हणून हा रोबोट वैद्यकीय सेवेसाठी कार्यान्वित केला जाणार आहे. पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांना सध्या प्रशिक्षण दिले जात आहे. कोविड रुग्णांसाठी रेल्वेच्या गुणात्मक व संख्यात्मक सेवा विकसित केल्या जात अहेत. भुसावळ रेल्वे विभागात हा रोबोट कार्यान्वित झाल्यास काम करायला अधिक संधी मिळू शकते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

रोबोटद्वारे तपासणी
सोलापूर विभागीय रेल्वे रुग्णालयात रोबोटचा वापर केला जात आहे. हा रोबोट तापमान, ऑक्सिजन मोजतो, रुग्ण व डॉक्टरांशी व्हिडिओव्दारे संवाद साधतो. स्वयंचलित सॅनिटायझर वितरण करतो, रुग्णांना अन्न, औषधे पुरवितो. 

डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी मध्य रेल्वेने नाशिक रोडचा समावेश असलेल्या भुसावळ विभागासह विविध ठिकाणी चोवीस तास वैद्यकीय पथके नियुक्ती केली आहेत.मध्य रेल्वेची वैद्यकीय पथके कोरोनाविरोधातील लढाईत युद्धपातळीवर काम करीत आहेत. नाशिक रोड रेल्वे स्थानकात गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा विकसित करण्यात आली असून त्याचा वापर प्रवाशांना होणार आहे. यामध्ये प्रत्येक प्रवाशाची स्क्रिनिंग व ऑक्सिजन तपासणी होत आहे. त्याबरोबरच प्रवाशांच्या आरोग्यविषयक तक्रारी निराकरणासाठी रेल्वेचे पथक सज्ज झाले आहे. रेल्वेस्थानकांवर स्वच्छतेवर भर दिला जात आहे. व्हेंटिलेटर कार्यशाळेसह डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, भुसावळ, पुणे आणि सोलापूर विभागातील रुग्णांच्या देखरेखीसाठी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि इतर तंत्रज्ञांची कराराच्या आधारावर नेमणूक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT