Market Committee nashik esakal
नाशिक

Nashik Bazar Samiti : बाजार समितीतील कथीत घोटाळ्यांची सुनावणी पूर्ण

सकाळ वृत्तसेवा

Nashik Bazar Samiti : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोरोना काळात गोरगरिबांना धान्यवाटपात झालेला कथित घोटाळा, तसेच गाळे विक्रीच्या प्रकरणात १ कोटी १६ लाखांचा अपहार झाल्याचा आरोप चुंभळे गटाने केला होता.

त्यावर बुधवारी (ता. १७) मुख्यमंत्री तथा पणन मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दुसऱ्यांदा सुनावणी झाली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी निर्णय राखून ठेवला आहे. (hearing of alleged scams in Nashik Bazar Samiti completed news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सुनावणीदरम्यान दोन्ही गटांनी लेखी स्वरूपात बाजू मांडली आहे. या प्रकरणात गेल्या ४ मेस मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासमोर सुनावणी झाली होती. तत्कालीन संचालक मंडळाने १ कोटी १६ लाखांचा भ्रष्टाचार केला, तसेच गाळे वाटप प्रकरणातही बाजार समितीचे नुकसान झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला होता.

तर, माजी सभापती देविदास पिंगळे यांच्या गटाने हा दावा फेटाळून लावला होता. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी राखून ठेवलेला निकाल कधी जाहीर होणार याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून कोणतीही स्पष्टता देण्यात आली नाही.

त्यामुळे सभापती, उपसभापतीपदाच्या निवडणुकीलादेखील विलंब होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी ही निवडणूक लवकर घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सहकार विभागाला दिलेले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पिंगळे गटाविरोधात निकाल दिल्यास हे प्रकरण पुन्हा न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT