Former minister Amit Deshmukh condoling the death of senior Congress leader Jayaprakash Chhajed at Congress Bhawan on Wednesday.
Former minister Amit Deshmukh condoling the death of senior Congress leader Jayaprakash Chhajed at Congress Bhawan on Wednesday. esakal
नाशिक

Nashik News : जयप्रकाश छाजेड यांना भावपूर्ण निरोप

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार व इंटकचे प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश जीतमल छाजेड (वय ७६) यांचे मंगळवारी (ता. १०) रात्री खासगी रुग्णालयात निधन झाले. बुधवारी (ता. ११) सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी काँग्रेससह विविध पक्षातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (heartfelt farewell to Jayaprakash Chhajed Nashik News)

श्री. छाजेड यांची प्रकृतीत गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार सुरू होते. त्यातच बुधवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यावर आप्तांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथेच त्यांचे रात्री साडेदहाच्या सुमारास निधन झाले.

हे वृत्त समजताच त्यांचे स्नेही व ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, उल्हास सातभाई, प्रमोद पुराणिक, जयप्रकाश जातेगावकर यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली.

ज्येष्ठ नेते म्हणून लौकिक

युवक काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे काम सुरू केलेल्या (कै.) छाजेड यांनी तत्कालीन खासदार मुरलीधर माने, पत्रकार सुरेश भटेवरा यांच्यासह पक्षकार्यात हिरिरीने भाग घेत वैभव प्राप्त करून दिले होते.

या त्रिकुटाने दुचाकीने ग्रामीण भागात प्रवास करून पक्षवाढीसाठी प्रयत्न केल्याचे जुनेजाणते कार्यकर्ते सांगतात. श्री. छाजेड यांचे वडील जीतमल व मुलगा आकाश अशा तीन पिढ्या काँग्रेसमध्ये कार्यरत होत्या.

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

काँग्रेस कमिटीत अंत्यदर्शन

श्री. छाजेड यांच्या निवासस्थानावरून निघालेली अंत्ययात्रा सायंकाळी काँग्रेस भवनात काहीकाळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. या वेळी माजी मंत्री अमित देशमुख, नितीन राऊत, उल्हास पवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यानंतर मेन रोड, वीर सावरकर पथ, दहिपूल, नेहरू चौक, दिल्ली दरवाजा, गंगाघाटमार्गे स्मशानभूमीत पोचली. त्यानंतर रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पराभवानंतरही मोठे काम

काँग्रेस पक्षाने जयप्रकाश छाजेड यांना विधानसभेसाठी तीन वेळेस संधी दिली. आणीबाणीनंतर १९७८ मध्ये झालेल्या विधानसभेसाठी काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी जाहीर केली; परंतु पक्षाचे बंडखोर (स्व.) शांतारामबापू वावरे यांनी त्यांचा निसटत्या मताधिक्याने पराभव केला. मात्र या पराभवानंतरही त्यांनी पक्षाचे काम सुरूच ठेवले.

त्यानंतर विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी छाजेड यांना विधान परिषदेत संधी दिली. आपल्या कार्यकर्तृवाने विधान परिषदेत छाजेड यांनी वेगळा ठसा उमटविला. त्यानंतर त्यांच्याकडे इंटकचे प्रदेशाध्यक्षपद बहाल करण्यात आले, या पदावर ते अखेरपर्यंत कार्यरत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT