heavily rained in Kasbe Sukene area nashik marathi news 
नाशिक

बेमोसमीने वाढवली शेतकऱ्यांची चिंता! काढणीला आलेल्या द्राक्षबागा धोक्यात

भरत मोगल

कसबे सुकेणे (जि. नाशिक) : गेल्या आठवडाभरापासून सतत ढगाळ हवामान व जोरदार पावसाने हजेरी लावल्यानंतर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता कमी होते न होते तोच गुरुवारी (ता.७) पुन्हा कसबे सुकेणे परिसराला जोरदार पावसाने झोडपून काढले. दुपारी तीनपासून कमी - अधिक प्रमाणात परिसरात पाऊस होत असून, मध्येच जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहे. 

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे धाबे दणाणले

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. ढगाळ हवामानामुळे द्राक्ष, कांदा, गहू, हरभरा पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी शेतकरी धडपड करीत असताना गुरुवारी बेमोसमी पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवली. पंधरा दिवसांपूर्वी देखील सतत ढगाळ वातावरण, सकाळचे दाट धुके व बेमोसमी पाऊस यामुळे अनेक द्राक्षबागांना तडे गेले होते. त्यातून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची लाखो रुपयांची हानी झाली होती. त्यातून शेतकरी सावरतो न सावरतो तोच पुन्हा बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे. चालू स्थितीमध्ये अनेक द्राक्षबागा विक्रीसाठी तयार झाल्या आहेत. त्यामध्ये काळी जातीच्या द्राक्षाचे प्रमाण मोठे असून, मामा जम्बो, जम्बो, नानासाहेब पर्पल, शरद सीडलेस, फ्लेम आदी प्रकारचे द्राक्ष सध्या कसबे सुकेणे परिसरात मोठ्या प्रमाणात तयार झाली आहेत. येत्या आठ दिवसांमध्ये अनेक द्राक्षबागा सुरू होणार आहे. मात्र, त्यातच आता पावसाने हजेरी लावल्याने द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली आहे. 

नुकसानीचा आकडा वाढणार... 

हवामान खात्यानेही शुक्रवारी (ता.८) पावसाचा इशारा दिला होता. त्यामुळे देखील द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या स्टेजमधील द्राक्ष बागांसाठी महागडी औषधे फवारावी लागणार असल्याने उत्पादन खर्चातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पाऊस असाच सुरु राहिल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT