Heavy rain damage paddy farming esakal
नाशिक

इगतपुरीतील भातशेतीला यंदा ग्रहण; सततच्या पावसाने मोठे नुकसान

गोपाल शिंदे

घोटी (जि. नाशिक) : तालुक्यात सलग दहा दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्यात हाहाकार माजवला आहे. या पावसाने भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले असून यंदा उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांचे गणितही कोलमडणार आहे. या पावसाने सर्वच जण हैराण झाले आहेत. वर्षातील मुख्य पीक आणि त्यावर वर्षभरातील कर्ज, इतरांची आर्थिक देवाणघेवाण अवलंबून असते, अशा भाताचीच यंदा वाट लागली आहे. या पावसाने शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे.

उत्पादन घटण्याची शक्यता

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर आदिवासी तालुक्यात पर्जन्यमान अधिक असल्याने भाताची लागवड सर्वाधिक होते. भात काढणीला पावसाने विश्रांती देणे गरजेचे असताना आठ दहा दिवसांपासून धिंगाणा घालणाऱ्या या पावसाने गतवर्षासारखी घट येण्याची चिन्हे आहेत. तालुक्यातील पूर्व मध्य व पश्चिम भागात दररोज पाऊस हजेरी लावत आहे. यामुळे भाताचे नुकसान होत आहे. भातशेती वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झाली आहे. उशिरा लावणी झालेल्या भात पिकांना सद्याच्या वातावरणात फुलोरा फुलण्याचा हंगामात पावसामुळे उत्पादनात घट येणार आहे.

अनुदान दुप्पट करण्यात यावे

भात क्षेत्रावर रोगराईने हैराण केले आहे. काढणीस आलेल्या पिकांत पाणी साठल्याने भात कापणी दरम्यान तारांबळ उडत आहे. यातच पाण्यात भिजलेल्या वाणांची कापणी करताना मजुरांना दुप्पटीने रोज द्यावा लागतो. खते, बियाणे यांसह मजुरी, रोगराईने हैराण शेतकरी आता किंटलला गतवर्षी दिलेले सातशे रुपये अनुदान दुप्पट करावे अशी मागणी करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT