Heavy rains  esakal
नाशिक

Rain Update : इगतपुरीसह घोटी अन् धरणगाव मंडलामध्ये 24 तासात अतिवृष्टी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : इगतपुरी तालुक्यात आज सकाळी संपलेल्या २४ तासात अतिवृष्टी झाली. इगतपुरी मंडलात ११९.५, घोटीमध्ये ८७.३, तर धरणगावमध्ये ८४.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. इगतपुरी तालुक्यात ६०.९, त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात ५०.८, तर पेठ तालुक्यात २५ मिलीमीटर पाऊस मागील २४ तासात झाला आहे. (Heavy rain in 24 hours in Ghoti Dharangaon Mandal along with Igatpuri nashik Rain Update Latest Marathi News)

आळंदी, वाघाड, ओझरखेड, तिसगाव, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर ही धरणे ‘फुल्ल’ झाली आहेत. याशिवाय कश्‍यपीमध्ये ९७, गौतमी गोदावरीमध्ये ९८, दारणामध्ये ९३, मुकणेत ९५, गिरणामध्ये ९१ टक्के जलसाठा ठेवण्यात आला आहे. गंगापूर धरणातून सध्यस्थितीत विसर्ग सुरु नसून या धरणात ७९ टक्के जलसाठा आहे.

आळंदीमधून ८०, पालखेडमधून ८१०, वाघाडमधून ७२५, ओझरखेडमधून १४०, दारणामधून ९ हजार ५९६, भावलीतून ९४८, वालदेवीतून ६५, कडवामधून २ हजार २५०, नांदूरमधमेश्‍वरमधून २२ हजार ८५, भोजापूरमधून ४००, हरणबारीमधून ३६०, केळझरमधून ७५, गिरणातून २ हजार ३७६ क्यूसेस विसर्ग सुरु आहे.

जिल्ह्यातील मोठ्या आणि मध्यम २४ धरणांमधील जलसाठा ८८ टक्के असून गेल्यावर्षी याच काळात ५५ टक्के जलसाठा होता. गेल्यावर्षी भावली, वालदेवी, हरणबारी ही धरणे ‘फुल्ल’ झाली होती. नांदूरमधमेश्‍वरमध्ये १०० टक्के जलसाठा ठेवण्यात आला होता.

तालुकानिहाय पर्जन्याची स्थिती

तालुकानिहाय आज (ता.१२) सकाळी संपलेल्या चोवीस तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये आणि आतापर्यंतच्या पावसाची टक्केवारी अनुक्रमे पुढीलप्रमाणे असून (कंसात गेल्यावर्षी १२ ऑगस्टपर्यंतच्या पावसाची टक्केवारी दर्शवते) :

मालेगाव-०.६-१८९.६ (९०.५), बागलाण-१.२-२०६.९ (८१.४), कळवण-८.७-२०८.९ (६६.९), नांदगाव-२.४-१७१.२ (१३७.२), सुरगाणा-१४.७-१४२.३ (४४.३), नाशिक-४.६-१४६.१ (५१), दिंडोरी-१२.१-२५८.९ (८२), इगतपुरी-६०.९-६७.३ (४७), पेठ-२५-१६४.२ (६८.९), निफाड-४.१-१८८.४ (९०.१), सिन्नर-१.४-१४५.७ (७०.८), येवला-३-१४९.३ (९२.३), चांदवड-३.८-२०४.७ (९१.७), त्र्यंबकेश्‍वर-५०.८-१०७.७(७१.७), देवळा-१.९-२१४.८ (१०६.२).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

SCROLL FOR NEXT