catchment area of dam it has been raining for 4-5 days and discharge of water from Darna Dam has started at 13,334 cusecs. esakal
नाशिक

इगतपुरीत धुव्वाधार पावसाची बॅटिंग; 132 मिमी विक्रमी पावसाची नोंद

ज्ञानेश्वर गुळवे

अस्वली स्टेशन (जि. नाशिक) : इगतपुरी तालुक्यासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसाची (heavy rain) संततधार सुरु आहे. आज दिवसभरात १३४मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर ४८२५मिमी विक्रमी पाऊस नोंदविला गेला आहे तर वार्षीक सरासरीच्या १४५.०८टक्के पाऊस पडल्याने धरणांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. (heavy rain in Igatpuri Record rainfall of 132 mm Nashik Monsoon Update news)

दारणा धरणातून १३३३४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असुन पाऊस असाच सुरु राहिला तर टप्याटप्याने विसर्गात वाढ करण्यात येईल अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. अतिवृष्टी नंतरच्या आठवड्याच्या कालखंडानंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाची संततधार सुरु झाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संततधार पाऊस पडत असल्याने भात खाचरात मोठया प्रमाणात पाणी साचून नदी नाले पुन्हा दुथडी भरुन वाहू लागले आहेत. भात पिकासाठी पाऊस पोषक असल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र पाऊस असाच सुरु राहिला तर दारणाधरणा बरोबरच मुकणे धरणातूनही पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार असून धरणावरील नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी धरण क्षेत्रात जावू नये असा सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

"धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरु असून धरण सरासरीच्या तुलनेत ६१टक्के भरले असून अद्यापही जोरदारपणे पाऊस सुरु असल्याने सद्यस्थितीत तेरा हजार तीनशे चौतीस क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु असुन पाऊस असाच पडत राहिला तर अतिरिक्त फुगवट्याचे पाण्याचा टप्याटप्याने विसर्ग वाढविण्यात येणार आहेत. नदी धोक्याची पातळी ओलांडू शकते त्यामुळे नागरिकांनी धरण क्षेत्रात जावू नये." -विजय रा.ठाकूर,शाखा अभियंता पाटबंधारे विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT