Heavy rain update esakal
नाशिक

नाशिक जिल्ह्यात पावसाचा कहर! नदीवरील पुल पाण्याखाली; अनेक गावांचा संपर्क तुटला

पालखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने कादवा नदीला पूर आला आहे.

माणिक देसाई

नाशिक : गेल्या दोन-तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पालखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने कादवा नदीला पूर आला असून रवळस पिंपरी जवळील पातळी पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे निफाड सहकारी साखर कारखान्यावर जाणारा मार्ग बंद झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

निफाड तालुक्यातील कादवा नदीला पालखेड धरणातून आज सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान 20770 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने कादवा नदी पात्रात प्रचंड प्रमाणात पाण्याची आवक झाली. त्यामुळे प्रशासनाने दखल घेत रवळस येथून निफाड सहकारी साखर कारखान्याकडे जाणाऱ्या मार्गात बॅरिकेट टाकून प्रशासनाने सतर्कता म्हणून आधीच मार्ग बंद केला होता. दरम्यान पालखेड धरणाचे पाणी नदीपात्रात आल्याने पातळी पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जवळपास 20 किलोमीटरचा फेरा पडणार आहे. असाच पाऊस चालू राहिल्यास या पावसाचा फटका परिसरातील वाहनधारक तसेच नागरिकांना बसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Eknath Shinde Meeting : अमित शहा-एकनाथ शिंदे यांच्यात अर्धा तास चर्चा; एकाच कारमधून प्रवास, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

IND vs AFG, Video: बुमराह आला अन् दुसऱ्याच बॉलवर विकेट घेतली! भुवनेश्वर कुमारच्या पंक्तीत मिळवलं स्थान

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? सौदीची पाइपलाइन बंद, फक्त ५ ते ७ दिवसांचा तेलसाठा शिल्लक

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

SCROLL FOR NEXT