latest nashik monsoon news
latest nashik monsoon news esakal
नाशिक

Nashik : जिल्ह्यातील आदिवासी पट्यात अतिवृष्टीने कहर

महेंद्र महाजन

नाशिक : वरुणराजाने सुरगाणा, दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात अतिवृष्टीने (heavy rain) कहर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील साठा ३७ टक्क्यांपर्यंत पोचला असून, गेल्या वर्षी याच कालावधीत धरणसाठा २७ टक्के होता.

संततधारेमुळे नांदूरमध्यमेश्‍वर, दारणा, पालखेड, कडवा धरणामधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी कृष्णावंती नदीला आलेल्या पुरात अडकलेल्या २५ पर्यटकांची राजूर पोलिस आणि स्थानिकांनी सुटका केली. (Heavy rains wreak havoc in tribal area of district Nashik Latest monsoon News)

नाशिक शहरामध्ये रविवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत ६२.२, तर त्यानंतर सायंकाळी साडेपाचपर्यंत सात मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. रविवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत धो-धो कोसळलेला पाऊस मंडलनिहाय (मिलिमीटर) असा : सुरगाणा तालुका ः उंबरठाण-२१२.८, बाऱ्हे- १८०.५, बोरगाव- १७४.३, मनखेड- २०६.५, सुरगाणा- २१२.८. दिंडोरी तालुका ः ननाशी- १९६, कोशिंबे- १३९. पेठ तालुका ः पेठ- १९५, जोगमोडी- १६२, कोहोर- १९५.

तालुकानिहाय रविवारी (ता. १०) आणि शनिवारी (ता. ९) सकाळी चोवीस तासांपर्यंत झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये याप्रमाणे असून (कंसात दोन दिवसांत झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये दर्शवितो) : मालेगाव- १९.६-४.९ (२४.५), बागलाण- ५३.७-९.२ (६२.९), कळवण- ६४.९-२६.१ (९१), नांदगाव- १५.८-१०.७ (२६.५), सुरगाणा- १९७.४-१०३ (३००.४), नाशिक- ३६.४-३६.५ (७२.९), दिंडोरी- ९५.२-४९ (१४४.२), इगतपुरी-४७.१-५७.९ (१०५), पेठ- १९५-१५५.१ (३५०.१), निफाड- २६-६.५ (३२.५), सिन्नर- २०-४.८ (२४.८), येवला- १५.६-८.६ (२४.२), चांदवड-२५-१०.९ (३५.९), त्र्यंबकेश्‍वर- ७१.५-६६.५ (१३८), देवळा- २७.५-८.५ (३६).

खरिपाच्या पेरण्यांना वेग

मॉन्सून अडखळत हजेरी लावत असल्याने यंदाच्या खरिपाच्या पेरण्यांबद्दलचे प्रश्‍नचिन्ह मागील आठवड्यापर्यंत तयार झाले होते. आता मात्र संततधारेने सातत्य राखल्याने खरिपाच्या पेरण्यांना वेग येणार आहे. आदिवासी भागात संततधार सुरू राहिल्याने भाताची रोपे टाकण्यास वेग आला आहे.

आगामी आठ ते पंधरा दिवसांमध्ये खरिपाच्या पेरण्या पूर्ण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्याचबरोबर टंचाईची समस्या हलकी होण्यास मदत झाली आहे. या पावसामुळे प्रशासनाकडून जिल्हाभरातील टँकर बंद करण्याचा धडाका येत्या काही तासांत अपेक्षित आहे. आजही वरुणराजाची हजेरी संततधार बहुतांश भागात कायम होती. ढगाळ हवामान आणि पावसामुळे हवेतील गारठा वाढला आहे.

जिल्हाभरातील स्थिती

० बागलाण : पश्‍चिम भागात नद्या-नाल्यांना पूर

० निफाड : गोदावरीच्या पात्रातील पाणवेली कुजल्या

० इगतपुरी : अस्वली-मुंढेगाव पुलाच्या कामाचा पर्यायी रस्ता गेला वाहून

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यातील चार शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर; कधी होणार मतदान?

Latest Marathi News Live Update : 'अशा बिनकामाच्या गोष्टींवर मोदी नक्कीच बोलतील..'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्याबाबत प्रियांका गांधींची प्रतिक्रिया

Game Of Thrones : लॅनिस्टर गादीचा वारस हरपला.. 'गेम ऑफ थ्रोन्स' मधील 'या' कलाकाराचं निधन; पार्टनरची पोस्ट चर्चेत

Sushma Andhare : मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अंधारे करणार तक्रार; प्रचार सभेतील भाषणावर घेतला आक्षेप

Google Wallet: गुगल वॉलेट भारतात लाँच; Google Payपेक्षा कसे आहे वेगळे, करता येणार 'ही' महत्त्वाची कामे

SCROLL FOR NEXT