Stagnant water in fields esakal
नाशिक

Unseasonal Rain : जुनी शेमळी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस; लाखोंचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

Unseasonal Rain : जुनी शेमळी (ता बागलान ) येथील परिसरात( आज (ता . २ ३ ) रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास जोरदार वा- या सह गारपीठ झाल्याने ग्रामस्थांचे घरावरील पत्रे' उडाल्याने संसार उघडयावर पडले आहेत. विज कंपनीचे खांब जमीनीवर कोसळले.

शेळ्या गायी मृत्यूमुखी पडले. शेतकऱ्यांच्या शेतातील झाडे उन्मळुन पडली. चाळीत कांदा भरत असताना उघड्यावर पडलेला कांदा पिकाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे अतोनात लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. (Heavy unseasonal rain with gale in Juni Shemli area Millions of losses nashik news)

येथील परिसरात जुनी शेमळी' नवी शेमळी नाग झरी , किरातवाडी, कॅनाल चौफुली आदि ठिकाणी सायकांळी पाचच्या सुमारास जोरदार वादळी वार्‍यासह गारपीठ झाल्याने जुनी शेमळी येथील शेतकरी राजेंद्र खैरणार यांची गाय मृत्यूमुखी पडली. तर गोरख शेलार यांच्या घरावरील पत्रे उडाले.

वसंत खैरणार यांची पाचटची झोपडी उडाल्याने संसार उघड्यावर पडला आहे. नवी शेमळी येथील बाबुलाल गायकवाड यांच्या घरावरील पत्रे उडून जमिनीवर पडले. तर वीज वितरण कंपनीचे खांब जमिनीवर कोसळले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शेळ्यामेंढ्या गायी मृत्यूमुखी पडल्या आहेत व आदी शेतकऱ्यांचे वादळी वाऱ्यामुळे व .गारपीठीने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतातील झाडे उन्मळून पडले, तर नवी शेमळी परिसरात वीज कंपनीचे खांब अक्षरशः वाकले आहेत व शेतकरी कांदा चाळीत भरत असताना उघड्यावरील कांदा पावसात भिजून प्लास्टिकचे कागद उडाल्याने अतोनात नुकसान झाले.

जनावरांचा चारा भिजुन खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने हाता तोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांचे अश्रु अनावर झाले आहेत. तरी पंचनामे करून लवकरात लवकर भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT