Bike riders without helmet esakal
नाशिक

Helmet Special Drive : दुचाकीस्वारांनो, हेल्मेट वापरा; आजपासून शहरात हेल्मेटसक्ती!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक शहर वाहतूक पोलिस शाखेकडून गुरुवार (ता. १) पासून आयुक्तालय हद्दीमध्ये पुन्हा हेल्मेटसक्तीची कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार आहे. आठवडाभरापूर्वीच पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी हेल्मेट सक्तीसंदर्भातील फर्मान जारी केले होते. त्यामुळे दुचाकीस्वारांनी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी हेल्मेटचा वापर करण्याचे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे. दरम्यान, या वेळी मुंबईच्या धर्तीवर सोशल मीडियाच्या माध्यमाचा वापर करण्याचे संकेत देत ‘स्पेशल ड्राईव्ह’ उपक्रम राबविला जाणार आहे. त्यासाठीची जय्यत तयारी वाहतूक पोलिस शाखेकडून करण्यात आलेली आहे. (Helmet Special Drive mandatory in city from today Nashik news)

शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये दुचाकीस्वारांसाठी हेल्मेटसक्ती आदेश लागू होते. त्याबाबत वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई सुरूदेखील होती. परंतु, त्यात काही प्रमाणात शिथिलता आली होती. यामुळे शहरात गेल्या काही महिन्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे अपघात झाले होते. यातून अनेकांचे प्राण, तर काहींना गंभीर स्वरूपाचे अपंगत्व आले होते. त्यामुळे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी १ डिसेंबरपासून पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये हेल्मेटसक्तीची कारवाई आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले होते. तसेच, विनाहेल्मेटची दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

आयुक्त करणार ‘ट्विट’

मुंबईच्या धर्तीवर पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे हेही नाशिकमध्ये हेल्मेटसक्तीसाठी सोशल मीडियाच्या माध्यमाचा वापर करणार आहेत. गुरुवारपासून सुरू होणाऱ्या या स्पेशल ड्राईव्हसाठी आयुक्त दररोज सकाळी शहरातील एका विशिष्ट मार्गावर शहर वाहतूक पोलिस शाखेकडून हेल्मेटसक्तीची कारवाई करणार असल्याचे ट्विट करतील. त्या मार्गावर सकाळ ९ ते ११ वाजेपर्यंत आणि, सायंकाळी ५ रात्री ७ वाजेपर्यंत ही विशेष कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे त्या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्या दुचाकीस्वाराला कारवाईची आगाऊ सूचना मिळाल्यास तो स्वत: हेल्मेटचा वापर करील, अशी पोलिस आयुक्तांची भूमिका आहे.

हेही वाचा : भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

बेशिस्तांसाठी सोयीचे नाही का?

आयुक्तांच्या भूमिकेनुसार दुचाकीचालकांमध्ये हेल्मेट वापराबाबत जनजागृती व्हावी, असा अपेक्षित आहे. परंतु, बेशिस्त दुचाकीस्वार हे ज्या मार्गावर हेल्मेटसक्तीची कारवाई सुरू असेल त्या मार्गाने जाणे टाळून अन्य मार्गांचा वापर करण्याचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळे आयुक्तांचा ट्विटचा फॉर्म्युला फोल ठरण्याचीच शक्यता अधिक आहे. तसेच, नाशिक शहरात दुचाकी वापरणाऱ्यांची संख्या लाखात असताना ते सारे ट्विटर हॅण्डल वापरत असतील अशी शक्यता नाही वा ते आयुक्तांचे ट्विट पाहतीलच असेही नाही.

‘सकाळ’ची भूमिका : हेल्मेटसक्ती व्हायलाच हवी

हेल्मेट सक्तीबाबत ‘सकाळ’ माध्यम समूहाने यापूर्वीच भूमिका स्पष्ट केलेली आहे. दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती असायलाच हवी. हेल्मेट न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई ही झालीच पाहिजे. हेल्मेट असल्याने अनेकांचे प्राण वाचले आहेत, तर अनेकांना हेल्मेट नसल्याने आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरलेच पाहिजे. त्यासाठी पोलिसांकडून होणाऱ्या दंडात्मक कारवाईचे समर्थन करणे क्रमप्राप्त ठरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arif Khan Chishti : मुस्लिम तरुणाचा मोठा निर्णय! संत प्रेमानंद महाराजांना किडनी दान करण्याची तयारी, वाचा कोण आहे आरिफ खान?

Whatsapp Mirror : व्हॉट्सअ‍ॅपवर एक परमिशन अन् बँक अकाऊंट रिकामं, 'हे' फेमस फीचर ठरतंय मोबाईल हॅकिंगचं कारण

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT