Police caught driver esakal
नाशिक

Nashik News: विनाहेल्मेट, ट्रीपलसीट वाहनचालक रडारवर! 2 आठवड्यात 25 लाखांचा दंड वसूल

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहरात प्राणांकित अपघातांची लक्षणीय वाढ पाहता पोलीस आयुक्तांनी विनाहेल्मेट व ट्रीपलसीट वाहनचालकांविरोधात धडक दंडात्मक कारवाईची मोहीम सुरू केली आहे.

गेल्या १२ दिवसांमध्ये वाहतूक शाखेने सुमारे साडेचार हजार विनाहेल्मेट तर, साडेचारशे ट्रीपलसीट दुचाकीचालकांविरोधात कारवाई करीत सुमारे २५ लाखांचा दंड वसूल केला आहे. (Helmetless triple seat drivers on radar 25 lakhs fine recovered in 2 weeks Nashik News)

शहर आयुक्तालय हद्दीमध्ये गेल्या काही दिवसात गंभीर स्वरुपाचे अपघात होऊन त्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने प्राणांकित अपघात झाल्याचे समोर आले आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सदरची बाब गांभीर्याने घेत वाहतूक शाखेला शहरात कठोर कारवाईचे आदेश दिले.

त्यानुसार, वाहतूक शाखेच्या उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या आदेशान्वये शहरात गेल्या १२ दिवसांपासून विनाहेल्मेट आणि ट्रीपलसीट दुचाकी चालकांना लक्ष करून दंडात्मक कारवाई केली जात आहे.

आयुक्तालयाच्या शहर वाहतूक शाखेच्या १ ते ४ शाखेंतर्गत सदरील दंडात्मक कारवाई करताना ४ हजार ३५९ जणांविरोधात विनाहेल्मेटची दंडात्मक कारवाई करीत २१ लाख ७९ हजार ५०० रुपयांचा दंड वसुल केला तर, ४५४ ट्रीपलसीटची कारवाई करीत ४ लाख ५४ हजार रुपयांचा दंड वसुल केला आहे.

८८ चालकांचे परवाने रद्द

दरम्यान, दंडात्मक कारवाई करूनही काही वाहनचालकांकडून वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे वाहतूक शाखेच्या निदर्शना आले.

त्यामुळे ८८ चालकांचा वाहन चालविण्याचा परवानाच रद्द करण्यासंदर्भात प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) सादर करण्यात आलेला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दुचाकीस्वारांना आवाहन

वाहनचालकांनी वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करावे. विशेषत: दुचाकीचालकांनी विनाहेल्मेट परिधान करावे.

तसेच, ट्रीपलसीट वाहन चालवू नये. यामुळे स्वत:च्या जीवाला धोका उत्पन्न होतो. त्यामुळे दुचाकीचालकांनी हेल्मेट परिधान करण्याचे आवाहन शहर वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

कारवाई.......वाहने .............. दंड वसूल

विनाहेल्मेट... ४,३५९ ...........२१ लाख ७९ हजार ५०० रुपये

ट्रिपलसीट.....४५४................ ४ लाख ५४ हजार रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hidu Rashtra: भारत हिंदुराष्ट्र कधीपर्यंत होणार? डेडलाईन आली; शंकराचार्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगून टाकलं

तुलसी २.० ची पहिली झलक- ‘क्यूँकी सास भी कभी बहू थी २’चा नॉस्टॅल्जिया पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!

Video : क्षणभराच्या रागात गेला जीव! निर्दयी माणसानं किरकोळ भांडणात तरुणाला धावत्या रेल्वेतून ढकललं; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील रामवाडीमध्ये पेट्रोल चोराने जाळल्या सहा मोटरसायकल

'चला हवा...'मध्ये निलेशच्या जागी अभिजीतच्या दिसण्यावर श्रेया बुगडेची प्रतिक्रिया; म्हणाली- तुला एकच गोष्ट सांगायला आवडेल की...

SCROLL FOR NEXT