nashik-municipal-corporation esakal
नाशिक

TATA कंपनीकडून नाशिक महापालिकेला मदतीचा हात

विक्रांत मते

नाशिक : सामाजिक दायित्वाच्या निधीतून टाटा प्रॉडक्ट्स (Tata Products) कंपनीमार्फत नाशिक रोडच्या बिटको रुग्णालयात विविध प्रकारच्या सुविधा पुरविण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. शस्रक्रियागृहात (Operation Theater) यंत्रसामग्री, तसेच उपकरणे बसविले जाणार आहे. आयसीआयसीआय (ICICI) बँकेकडून अत्याधुनिक व्हेन्टिलेटर (Ventilator) दिले जाणार आहे.

करन्सी नोट कंपनीकडून कॉम्पोनंट ब्लड बॅंकेची (Blood Bank) सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठे हॉस्पिटल म्हणून महापालिकेच्या नाशिक रोड येथील नवीन बिटको रुग्णालयाची नोंद झाली आहे. कोरोनाकाळात सर्वाधिक उपचार या रुग्णालयामार्फत झाले. कोरोनाच्या (Corona) पहिल्या व दुसऱ्या लाटेत प्रभावशाली कम करताना आता तिसऱ्या लाटेचा (Third Wave) सामना करण्यासाठी रुग्णालय सज्ज झाले आहे. या रुग्णालयात महापालिकेकडून विविध आधुनिक सुविधा पुरविल्या गेल्या. त्याला आता खासगी संस्थांचा हातभार लागत आहे. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी टाटा (TATA), रिलायन्स (Reliance), महिंद्र ॲन्ड महिंद्र (Mahindra & Mahindra), आयसीआयसीआय (ICICI) आदी विविध संस्थांना सामाजिक दायित्वाच्या निधीतून मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार टाटा प्रॉडक्टस् कंपनीने नाशिक रोडच्या नवीन बिटको रुग्णालयात मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. बिटको रुग्णालयातील शस्रक्रिया गृहासाठी यंत्रसामग्री व उपकरणे टाटा प्रॉडक्ट्स कंपनीकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे. कंपनीच्या अधिकारी व तंत्रज्ञांनी रुग्णालयातील शस्रक्रिया गृहाची पाहणी केल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद दिला.

सीएनपी, आयसीआयसीआयचा पुढाकार

करन्सी नोट प्रेस (CNP) कंपनीकडून बिटको रुग्णालयात कॉम्पोनंट ब्लड बँकेला निधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या बॅंकेत रक्त पिशव्यांबरोबरच प्लाझा, प्लेटलेटसच्या सुविधादेखील उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आयसीआयसीआय बँकेमार्फत रुग्णालयासाठी सहा अत्याधुनिक व्हेन्टिलेटर उपलब्ध करून दिली जाणार आहे. बँकेच्या प्रतिनिधींनी नुकतेच महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

पानिपताच्या लढाईनंतर या पेशव्याचं प्रेत विजयचिन्ह म्हणून अफगाणी सैनिक नेणार होते ! इतिहासातील अवघड प्रसंग

Photos : अंतराळातून दिसले पृथ्वीवर कोसळणाऱ्या प्रकाशस्तंभाचे अद्भुत दृश्य; शास्त्रज्ञही थक्क, पाहा आश्चर्यकारक फोटो..

Solapur News: 'मंगळवार, बुधवारी शाळा राहणार बंद'; वाढीव टप्पा अनुदानासाठी शिक्षक संघाचा निर्णय, नंतर मुंबईत आंदोलन

SCROLL FOR NEXT