MLA devyani friends suggest Use dead water reservoir of Jayakwadi nashik news  esakal
नाशिक

Nashik News: जायकवाडी पाणी प्रकरणी उच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिकसह अहमदनगर जिल्ह्यातून ८.६०३ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर मंगळवारी (ता.७) सुनावणी होणार आहे.

तोपर्यंत पाणी सोडावे की नाही, याविषयी प्रशासनाला स्पष्ट आदेश मिळालेले नाहीत. त्यामुळे पाण्यावरून संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वाढत चालली आहे. (High Court hearing on Jayakwadi water case on 7 nov nashik news)

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने समन्यायी पाणी वाटपाच्या आधारे गंगापूर समुहातून ५०० दशलक्ष घनफूट, दारणा समुहातून २६४३ दशलक्ष घनफूट, मुळा समुहातून २१००, प्रवरा समूहात ३३६० असे नाशिक व नगर जिल्ह्यातून एकूण ८६०३ दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीसाठी सोडण्याचे आदेश दिले आहेत.

त्यास भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी विरोध दर्शवत नाशिक व नगरमधून पाणी सोडण्याऐवजी अपवादात्मक स्थिती गृहीत धरून जायकवाडीच्या मृत साठ्यातून पाच टीएमसी पाणी वापरास परवानगी देण्याचा विषय मांडला आहे.

याच अनुषंगाने महामंडळाच्या आदेशाविरोधात संजय तुंगार यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आता मंगळवारी सुनावणी घेण्यात येणार आहे.

म्हणून पाणी सोडण्यास विरोध

याचिकाकर्ते तुंगार हे शिंदे येथील दिवंगत राजाभाऊ तुंगार सहकारी उपसा सिंचन संस्थेचे अध्यक्ष आहेत. यंदाच्या अवर्षण वर्षात वरच्या भागातील धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे.

जायकवाडीत २६ टीएमसी इतका मृतसाठा आहे. महामंडळाच्या आदेशान्वये पाणी सोडताना २.६६३ टीएमसी (२६६३ दशलक्ष घनफूट) पाण्याचा नाहक अपव्यय होईल. यापूर्वी अशा परिस्थितीत जायकवाडीतील मृत साठ्याचा वापर केल्याचा दाखला आमदार फरांदे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna News: महाशिवरात्र व हरिनाम सप्ताह सुरू असताना बाेकड कापल; जालना जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार, ग्रामस्थांचा रस्त्यावर ठिय्या!

Kolhapur Muncipal : पाच वर्षांत १२ स्वीकृत नगरसेवक; कोल्हापूर महापालिकेत भाजपची नवी राजकीय रणनीती

Magh Mela 2026: कुंभमेळ्याचा रेकॉर्ड मोडला! प्रयागराजमध्ये २२ कोटी भाविकांनी मारली डुबकी; ४४ दिवसांच्या माघ मेळ्याची सांगता

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

SCROLL FOR NEXT