New Married Couple esakal
नाशिक

नाशिक : उच्च शिक्षित वधू- वराचा बैलगाडीने प्रवास

संदीप पाटील

विराणे (जि. नाशिक) : पूर्वी पायी, नंतर बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रक, टेम्पोवर वऱ्हाडी मंडळी लग्नाला जात असे. आता तर बस, चारचाकी वाहनाची व्यवस्थाच वधू- वर पित्याला वऱ्हाडी मंडळीसाठी करावी लागते. लग्नसमारंभ संपल्यानंतर वरासाठी व वधुला सासरी आणण्यासाठी हायटेक चारचाकी वाहनांची व्यवस्था वरपक्ष करत असतो. परंतु, या हायटेक खोट्या प्रतिष्ठेला फाटा देत प्राथमिक शिक्षक (Primary Teacher) उत्तम दासनूर (ता. मालेगाव) यांची कन्या वधू गितांजली व मालेगाव येथील प्रगतिशील शेतकरी हिरामण काळे यांचे पुत्र डॉ. अविनाश यांनी लग्नमारंभ संपल्यावर चक्क बैलगाडी वर घरापर्यंत प्रवास केला. उच्च शिक्षित जोडप्याच्या या पारंपरिक पद्धतीच्या प्रवासाची सर्वत्र चर्चा आहे. वधू गितांजली बी. फार्म तर वर डॉ. अविनाश बीव्हीएसचे शिक्षण झाले आहे.

बैलगाडीचे बैल देखील रंगीबेरंगी रंगांनी सजवले होते. बैलगाडीच्या पुढच्या भागात विविध रंगाच्या फुलांचा गुच्छ करून लावण्यात आले होते. तर बैलगाडीला विविध रंगांच्या फुलांची कमान सजविण्यात आली होती. वर अविनाशने वधू गितांजलीला हात देत बैलगाडीवर बसविण्यास मदत केली. वर व वधू बैलगाडी देखील चालवली. बैलगाडीच्या संपूर्ण प्रवासात वधू व वर उत्साहात होते. बैलगाडीवर वधू- वर रस्त्यावरून जात असताना वाहनधारक आपले वाहन थांबवून कुतुहलाने पाहत होते. पादचारी, दुकानदार, तसेच घरातून बाहेर निघत बघ्यांची गर्दी झाली होती. सुमारे पाच किलोमीटर बैलगाडीचा प्रवास करत वधू सासरी पोहचली. वराच्या घराच्या आजूबाजूला राहणाऱ्यांनी तोबा गर्दी केली होती. तर ज्येष्ठांना आपल्या लग्नावेळीचा बैलगाडीचा प्रवास आठवत चर्चा करत होते. घरी पोहचल्यावर वधू- वराचे औक्षण करण्यात आले.

"लग्न सोहळा पार पडल्यानंतर घरापर्यंत बैलगाडीने जाऊ अशी वधू व वराची ईच्छा होती. त्यामुळे आकर्षक बैल व फुलांनी सजवलेली बैलगाडीची व्यवस्था केली. यामुळे पारंपरिक पद्धतही जोपासली गेली व आधुनिक युगात तरूणांपुढे चांगला संदेश पोहचला."

- उत्तम दासनूर, कंक्राळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जरांगेंनी तिसऱ्यांदा मागितली परवानगी, फक्त ५० जण, वेळ पाळणार आणि शांततेत आंदोलन; मुंबई पोलिसांना दिलं हमीपत्र

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ; अंतरवाली सराटी ते मुंबई प्रवासात विशेष सुरक्षा पथक तैनात

Latest Marathi News Update : कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही...: राज ठाकरेंच्या टीकेचा रोष कोणाकडे

Rishi Panchami 2026: ऋषिपंचमीला नांगर न लागलेल्या रानभाज्यांचा नैवेद्य का दाखवला जातो? जाणून घ्या धार्मिक अन् वैज्ञानिक कारण!

Police Officer Death: अचानक प्रकृती बिघडली अन् रक्ताची उलटी झाली; २५ वर्षीय महिला पोलिसाची मृत्यूशी झुंज अपयशी

SCROLL FOR NEXT