Highway Ghoti Police seized gutka worth Rs 25 lakh on Nashik Mumbai Highway
Highway Ghoti Police seized gutka worth Rs 25 lakh on Nashik Mumbai Highway  Sakal
नाशिक

घोटी महामार्ग पोलिसांची मोठी कारवाई; पकडला २५ लाखांचा गुटखा

गोपाळ शिंदे

घोटी (नाशिक) : मुंबई-नाशिक महामार्गाच्या लगत घाटनदेवी मंदिर शिवारात महामार्ग घोटी केंद्र पोलिसांना पंचवीस लाख रुपयांचा गुटखा मंगळवारी ( ता. ९ ) सव्वा दोन वाजता पकडण्यात यश आले. गोपनीय खबऱ्यांकडून महामार्ग घोटी केंद्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे यांना दूरध्वनी वरून लाखो रुपयांचा गुटखा बेवारस स्थितीत पडलेला असल्याचे सांगितले. यावेळी वालझाडे यांनी तातडीने आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेत समक्ष पाहणी करून दिलेली खबर पक्की असल्याची खात्री करून इगतपुरी पोलीस ठाण्यात कळविले.

महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा पांढऱ्या सफेत रंगाच्या ३३ sak लिहिलेल्या गुटका भरलेल्या मोठ्या प्लास्टिक गोण्या आढळून आल्या. दुर्गम व माळ राणावर संबंधित गुटख्याची उलाढाल व ने-आण कोण करीत आहे याबाबत इगतपुरी पोलीस तपास करणार आहेत. गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू झाले असून अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांना बोलवण्यात येऊन अधिक तपासात निष्पन्न होणारी बाब धक्कादायक होवू शकते. या अगोदरही महामार्ग पोलिसांनी सराईत गुन्हेगारी वृत्तीच्या इसमाच्या मुसक्या आवळून त्यांना जेरबंद करण्यास मदत केली आहे. महामार्ग पोलिस पथकात यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे,पोलिस हवालदार संतोष गांगुर्डे, जितेंद्र पाटोळे, राम वारुंगसे, जगदीश जाधव यांनी कामकाज पाहिले. दरम्यान इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांनी संपूर्ण गुटखा ताब्यात घेत अज्ञात व्यक्ती वर गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू होते. अन्न व औषध प्रशासनाकडून मोजमाप झाल्यावर कदाचित आकडा वाढू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Supriya Sule : आईवर बोलला तर करारा जबाब देईन - सुप्रिया सुळे

Arvind Kejriwal : ''केजरीवाल अन् सिसोदिया यांच्याविरोधात एकसारखेच पुरावे कसे? सिंघवींचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेली निवडल्यानं निरुपम यांचा हल्लाबोल; म्हणाले, पळून गेले...

SRH vs RR, IPL 2024: 'भयानक अंपायरिंग...', हेडची बॅट हवेत होती असं सांगत माजी भारतीय क्रिकेटरने थर्ड अंपायरवर साधला निशाणा

SCROLL FOR NEXT