Dry Fruits Mart at Old Nashik esakal
नाशिक

महागाईमुळे शीरखुर्म्याचा गोडवा कडवट; सुकामेव्याच्या दरांमध्ये वाढ

- युनूस शेख

जुने नाशिक : महागाईमुळे सुकामेवा (Dry Fruits) दरांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. शीरखुर्म्याचा (Sheerkhurma) गोडवा महागाईने कडवट झाला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यात पिस्ता (pista) आणि खसखस दराने सर्वाधिक उसळी घेतली आहे. २ हजार ६०० रुपये किलो खसखस, तर पिस्ता १ हजार ८०० रुपये प्रतिकिलो विक्री होत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

रमजान ईदला (Ramzan Eid) शिरखुर्मा तयार करण्यास सर्वाधिक महत्त्व आहे. महिनाभराचा रोजा ईदच्या दिवशी शिरखुर्मा सेवन करून सोडला जात असतो. तत्पूर्वी शिरखुर्मा तयार करून फातिया पठण केले जाते. विविध प्रकारच्या सुकामेव्याचा वापर करून शिरखुर्मा तयार केला जातो. त्याच्या गोडव्याने मन तृप्त होत असते. यंदा मात्र महागाईमुळे गोडवा काही प्रमाणात कडवट झाला आहे. सुमारे ३० ते ४० टक्के वाढ झाली आहे. यात प्रत्येक पदार्थांमध्ये सुमारे शंभर ते दोनशे रुपयांची वाढ झाली आहे. खसखस आणि पिस्त्याचे दर सर्वाधिक वाढले आहेत. असे जरी असले तरीदेखील गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत यंदा ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाउन आणि कडक निर्बंधामुळे रमजान ईद साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली होती. मोठ्या प्रमाणात सुकामेवा खरेदीकडे ग्राहकांनी पाठ केली होती. या वर्षी परिस्थिती सामान्य असून निर्बंध हटविण्यात आले आहे. त्यामुळे बिनधास्तपणे ग्राहक खरेदीसाठी येत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

असे आहे दर
शिरखुर्माचे पदार्थ (दर किलोमध्ये)
मागील दर सध्याचे दर
पिस्ता १ हजार ६०० १ हजार ८००
अक्रोड १ हजार १ हजार २००
अंजीर १ हजार १ हजार २००
खसखस २ हजार २ हजार ६००
खोबरे १८० २००
खारीक २०० २४०
किसमिस ३०० ३००
बदाम १ हजार ९००
काजू ९०० ९००
तूप १२० १८०
सुतरफेणी १२० १५०
चुंबळ शेवई १०० १४०

"महागाईमुळे सुकामेव्याच्या दरांमध्ये सुमारे ३० ते ४० टक्के निवड झाली आहे. असे असले तरी ग्राहकांचा गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत या वर्षी चांगला प्रतिसाद मिळत आहे."
- युनूस तांबोळी, व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

₹85 लाख CTC, पण हातात फक्त ₹3 लाख! बाकीचे पैसे कुठे जातात? कंपनीच्या वाइस प्रेसिडेंटनेच सांगितलं पगाराचं खरं गणित

IND vs PAK Final: वैभव-श्रेयस स्वस्तात परतले, पण अभिषेक-तिलकने डाव सावरला! शेवटच्या षटकांत धावांचा पाऊस; भारताची गाडी २०० पार

Manoj Jarange,: आंदोलन मोडीत काढण्याचा डाव;जरांगेंचा आरोप; राज्य सरकारवर टीका

चेहऱ्यावर नाही, ‘या’ गोष्टींवरून ओळखा माणसाचा स्वभाव; चाणक्य नीती काय सांगते?

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

SCROLL FOR NEXT