poddar.jpg 
नाशिक

...अन् अखेर 'त्यांची' शेवटीची इच्छा अपूर्णच...वेळच अशी की सगळेच हतबल

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (सिडको) माझ्या मृत्यूनंतर माझे देहदान करा...अशी त्यांची अखेरची इच्छा त्यांनी कुटुंबियांकडे व्यक्त केली होती. त्याचे निधन झाले अन् ही इच्छा कुटुंबियांना सांगितली...पण ती इच्छा अपूर्णच राहिली..त्याला कारण असे की...

अखेरची इच्छा अपूर्णच

शहरातील अशोका मार्गावरील बॅंकेचे निवृत्त व्यवस्थापक विजय पोद्दार यांनी त्यांच्या मृत्यूनंतर देहदानाचा निर्णय घेतला होता. नुकतेच त्यांचे एका खासगी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नी मंदाकिनी व मुलगा स्नेहल यांनी डॉक्‍टरांना वडिलांची अखेरची इच्छा देहदानाची असल्याचे सांगितले. डॉक्‍टरांनी समाधान व्यक्त केले. परंतु सध्या कोरोनामुळे वैद्यकीय महाविद्यालय पूर्णतः कोविड- 19 करण्यात आल्यामुळे देहदान करता येणार नाही, असे सांगितले आणि त्यांच्या मृत्यूनंतरची शेवटची इच्छादेखील या कारणामुळे पूर्ण होऊ शकली नाही. याचे त्यांच्या नातेवाइकांना वाईट वाटले. अखेर पंचवटी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. लॉकडाउमुळे देहदान करण्याची इच्छा अपुरीच राहिल्याची सल पोद्दार कुटुंबात कायम राहिली आहे. 

"देहदान करा' म्हणून सरकार नेहमी नागरिकांना आवाहन करते. परंतु ज्यांनी सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत मृत्यूनंतर देहदान करण्याचे ठरविले. त्यांनादेखील सध्याच्या कोरोनाच्या काळात वैद्यकीय महाविद्यालय "कोविड-19' च्या उपचारासाठी राखीव करण्यात आल्याने, मृतांच्या इच्छेनुसार देहदान करता येणार नसल्याचे सांगायची वेळ डॉक्‍टरांवर आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladesh Bus Accident : प्रवाशांनी खचाखच भरलेली बस नदीत उलटली, २३ जणांचा मृत्यू, थरारक अपघाताचा व्हिडिओ समोर

Vaibhavwadi Kolhapur Railway Project : वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा ‘डीपीआर’ तयार : रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची माहिती

Pune News: गॅस पाइपलाइनसाठी केंद्राची नवी नियमावली; परवानगी प्रक्रियेतील अडथळे दूर, घरगुती पीएनजी वापराला मिळणार गती

Pune News: हवेलीतील ४६ अधिकारी दोषी! पुण्यातील जमीन मोजणी गैरव्यवहार प्रकरण, कर्मचाऱ्यांची पदोन्नती थांबविण्यात येणार..

IPL 2026 Marathi News: हर्षित राणाच्या जागी KKR च्या ताफ्यात भारताचा स्पीडस्टार... गुजरात टायटन्सनेही खेळाडू बदलला

SCROLL FOR NEXT