Sahebrao Thackeray while preparing khawa for making jaggery pedha at Kajisangvi (T.Chandwad) and jaggery pedha in the second photo.
Sahebrao Thackeray while preparing khawa for making jaggery pedha at Kajisangvi (T.Chandwad) and jaggery pedha in the second photo. esakal
नाशिक

Nashik Food News: ‘कुछ मीठा...च्या दुनियेत आता गुळाचा पेढा! चांदवडच्या पेढ्यांच्या दुनियेत निसर्गची सफर

हर्षल गांगुर्डे : सकाळ वृत्तसेवा

गणूर : शुभकार्याचा श्रीगणेशा असो वा असो आनंदवार्ता, हक्काचा पेढा भरवून तोंड गोड करण्याची संस्कृती पिढ्यानपिढ्या रुजत, बहरत गेली. भारतीय सण- उत्सवांत विविध परंपरा, प्रथा असल्या तरी सर्वच धर्मांना एकाच माळेत गुंफणारी कॉमन गोष्ट म्हणजेच कुछ मीठा हो जाये...!

दिवाळीचं फराळ, 'ईद' चा 'शीर खुर्मा’, बौद्ध धम्मातील खिरदान अन् असे कितीतरी गोड प्रकार इथल्या सणांवर राज्य करतात. याच गोड दुनियेत आता दिमाखदार पदार्पण केलं आहे ते चांदवडच्या गुळाच्या पेढ्याने.

प्रसिद्ध चांदवडचा पेढा जिथून नावारूपास आला त्याच चांदवडच्या भूमीतून आता निसर्ग या नावाने 'गुळाचा पेढा ' देखील आपली नवी ओळख निर्माण करू पाहत आहे. (home cow milk jaggery pedha from chandwad named nisarg pedha got famous nashik food news)

काजीसांगवी येथील उपक्रमशील तरूण शेतकरी साहेबराव ठाकरे यांनी केलेल्या या प्रयोगाची रुचकर चर्चा सद्या परिसरात आहे.

खर तर चांदवड तालुक्याला लाभलेली डोंगररांग, त्यात मुक्तपणे शेकडो प्रकारच्या वनस्पती खाणाऱ्या जनावरांच्या दुधापासून बनवलेला चांदवडचा पेढा अनेक दशकांपासून खवैय्यांच्या जगतात राज्य करत आहे.

शुद्धतेची खात्री अन् चवीची हमी देणारा हा पेढा अगदी साता समुद्रापार देखील गेला. मधुमेहाची राजधानी होऊ पाहणाऱ्या भारतात साखरेला पर्याय म्हणून गुळाचे चहा अन् तत्सम अनेक पदार्थ बाजारात आले.

त्याच वाटेने आता गुळाचा पेढा देखील बाजारात दाखल झाला असून त्याला उत्तम प्रतिसाद देखील मिळत आहे.

दिवाळी पर्वात महाराष्ट्रात अन्न आणि प्रशासन विभागाकडून भेसळयुक्त खव्यावर ठिकठिकाणी कारवाया झाल्या. पैसे मोजून आरोग्याशी छेडछाड होत असल्याचे बघून नागरिक या मिठाईकडे पाठ फिरवतात.

दुग्धजन्य पदार्थांची मागणी घटल्याने दुधाचे दर देखील ढासळतात. या सर्व कोलाहलात शुद्धतेची कास धरून प्रामाणिकपणे बाजारात उतरलेला गुळाचा पेढा चर्चेचा विषय ठरत आहे.

घरगुती गाईंच्या दुधापासून प्रथम खवा व नंतर पेढा असा प्रवास करणारा हा पदार्थ चांदवडचा गुळाचा पेढा म्हणून नवी ओळख निर्माण करत आहे.

निसर्ग पेढ्याचे संचालक श्री. साहेबराव ठाकरे यांनी गुळचा व साखरेचा पेढा घरपोच देण्याची नियोजन केले आहे. त्यासाठी त्यांनी आनलाईन nisargdairyproducts.com नावाने वेबसाईट सुरु केली आहे.

"घरच्याच गायींचे दूध वापरत मोकळ्या पटांगणात चूल मांडत आम्ही खवा बनवतो. रेणुका देवीच्या यात्रेत लोकांच्या भेटीस आलेला हा पेढा भाविकांच्या माध्यमातून राज्यभर पोचला, तशी मागणी वाढली आहे. नामवंत ऑनलाईन शॉपिंग कंपनीकडून देखील पुरवठ्याबाबत विचारणा सुरू आहे. मात्र शुद्धतेबाबत कुठलीही तडजोड न करता मोजकाच माल रोज निर्माण करण्यात येत असल्याने सद्या जिल्ह्यात मर्यादित स्वरूपात घरपोच सुविधा आम्ही सुरू केली आहे."

- साहेबराव ठाकरे, संचालक, निसर्ग गुळाचा पेढा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Deepika Padukon : बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

धक्कादायक! नालासोपारा मतदारसंघातील तब्बल 'इतके' लाख मतदार गायब; निकालावर होणार थेट परिणाम

Magical Blanket : सत्यात अवतरलं क्षणात गायब करणारं हॅरी पॉटरचे जादुई ब्लॅंकेट, हे गॅजेट आहे कमाल

SCROLL FOR NEXT