devendra fadnavis  Sakal
नाशिक

Nashik News: मालेगावला लवकरच पोलिस आयुक्तालय; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

सकाळ वृत्तसेवा

Nashik News: मालेगाव येथे स्वतंत्र पोलिस आयुक्तालयासाठी गेल्या कित्येक वर्षांपासूनच्या प्रलंबित मागणीला उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच मालेगावला पोलिस आयुक्तालय अस्तित्वात येणार असल्याचे आश्वासन दिले.

आयुक्तालय हे शहराच्या कायदा व सुव्यवस्थेसाठी अत्यंत गरजेचे असल्याचे मानले जाते, त्यामुळे या निर्णयामुळे शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे. (Home Minister Devendra Fadnavis assured Police Commissionerate Malegaon nashik news)

नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयातून विभाजित करून मालेगाव येथे स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची निर्मिती करण्यात यावी, यासाठी २०१८ मध्येच तत्कालीन पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी पोलिस महासंचालकांना प्रस्ताव दिला आहे. त्याआधीपासूनच मालेगाव पोलिस आयुक्तालयाची मागणी प्रलंबित आहे.

याच अनुषंगाने लोकप्रतिनिधींनी सोमवारी (ता. १८) नागपूर येथे अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत कायदा व सुव्यवस्थेसाठी मालेगावला पोलिस आयुक्तालय सुरू करण्याची मागणी केली. त्यावर गृहमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच स्वतंत्र मालेगाव पोलिस आयुक्तालय अस्तित्वात येईल, असे आश्वासन दिले आहे.

...असा आहे प्रस्ताव

२०१८ मध्ये दिलेल्या प्रस्तावानुसार १९४७ ते २००६ पर्यंत गंभीरस्वरूपाच्या २५ दंगली झालेल्या आहेत. सप्टेंबर २००६ मध्ये बाँबस्फोटाची घटना घडली होती. याशिवाय जातीय स्वरूपाच्या लहानसहान घटना सातत्याने घडत असतात. २०११ च्या जनगणनेनुसार पाच लाख ९० हजार, तर आजमितीस सुमारे दहा ते १२ लाख लोकसंख्या शहराची आहे.

शहराचा वाढता विस्तार व शहरीकरणामुळे दिवसेंदिवस कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होतो आहे. यासाठी मालेगावात स्वतंत्र पोलिस आयुक्तालय गरजेचे आहे. नोव्हेंबर महिन्यात नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनीही हा प्रस्ताव पोलिस महासंचालकांना सादर केला. तोच प्रस्ताव गृहविभागाच्या अपर सचिवांनाही देण्यात आला आहे.

...असे असेल मनुष्यबळ

पोलिस आयुक्त तथा पोलिस उपमहानिरीक्षक- एक, पोलिस उपायुक्त- तीन, सहाय्यक पोलिस आयुक्त- सात, पोलिस निरीक्षक- ३२, सहाय्यक निरीक्षक- ३२, उपनिरीक्षक- ६७, सहाय्यक उपनिरीक्षक- १६६, हवालदार- २३७, पोलिस नाईक- २६०, पोलिस शिपाई- ६८८ आदींसह सुमारे एकूण : एक हजार ७६४

प्रस्तावित पोलिस ठाणे

मालेगाव शहर, आझादनगर, आयशानगर, पवारवाडी, रमजानपुरा, सायने, सौंदाणे, मालेगाव छावणी, मालेगाव कॅम्प, मालेगाव किल्ला, मनमाड चौफुली, मालेगाव तालुका, सोयगाव, द्याने.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI ECL Rule: आरबीआयच्या नवीन नियमांमुळे खासगी बँकांचे कर्ज महागणार? कोणत्या बँकांवर होणार परिणाम?

French PM Resigns: फ्रान्सची राजकीय अस्थिरता शिगेला! मंत्रिमंडळ नेमलं, पण पंतप्रधानांचा काही तासांत राजीनामा

Vijay Wadettiwar: ''काँग्रेसला मराठा समाजाने नाही तर...'', जरांगेंना उत्तर देताना वडेट्टीवारांचं मोठं विधान

Pune Traffic Police : मोशीत वाहतूक पोलिसाला मारहाण करणारे दोघे अटकेत; सिग्नल तोडल्याचे छायाचित्र काढल्याने वाद

Shocking News: हृदयद्रावक घटना ! पुराने हाता तोंडाशी आलेला घास हिरावला; शेतकऱ्याने दुसऱ्याच दिवशी जीवन संपवले

SCROLL FOR NEXT