Home Ministry refusal to mcoca act to suspects in Nagare extortion case nashik news esakal
नाशिक

Nagare Extortion case : नागरे खंडणी प्रकरणातील संशयितांवर मोका लावण्यास गृहमंत्रालयाचा नकार

सकाळ वृत्तसेवा

(सातपूर जि. नाशिक) : भाजप पदाधिकारी व ठेकेदार विक्रम नागरे खंडणी वसुली प्रकरणातील व मोकांतर्गत कारवाई करण्यात आलेले संशयीतांना 31 मार्चला मोका लावण्यास गृह मंत्रालयाकडून नकार देण्यात आला.

तसे आदेश पोलिस आयुक्तांना देण्यात आल्यामुळे नागरे यांच्या राजकीय वर्चस्वाला धक्का बसल्याचे बोलले जात आहे. (Home Ministry refusal to mcoca act to suspects in Nagare extortion case nashik news)

या प्रकरणातील फिर्यादी विक्रम सुदाम नागरे यांच्या घरावर हल्ला करून खंडणी मागितल्या प्रकरणात फरारी दीपक भालेराव, रोशन काकड, संजय जाधव, गणेश लहाने, गौरव ऊर्फ गुलब्या घुगे, अनिरुद्ध शिंदे, जया दिवे यांच्यासह इतर संशयितांचा शोध घेऊन अटक करण्याबाबत पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आदेश दिले होते.

तसेच मोका लावण्याबाबत गृहमंत्रालयात प्रस्ताव सादर केला होता. त्या अनुषंगाने सदर पथकाने संशयित मागील तीन महिन्यांपासून फरारी फिरोज ऊर्फ बब्बू मुस्तकीस शेख (रा. अमृतधाम, पंचवटी), यास १९ जानेवारीला सायंकाळी अटक केली होती. तर संजय जाधव यालाही मागील आठवड्यात ताब्यात घेतले आहे.

पण इतर संशयित अजूनही फरार होते. पण दरम्यानच्या काळात याबाबत दोन्ही बाजूंनी राजकीय वजन वापरत आपले वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. नागरे यांनी भाजप आमदारांवरही संशयितांना वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप केला होता.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

त्यानंतर सदर वाद थेट उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस याच्याकडे गेल्याने यावर तोडगा काढत संबंधित संशयितांवर मोकांतर्गत कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले होते. यानंतर नागरे खंडणी वसुली प्रकरणातील भाजप पदाधिकाऱ्याचा भाऊ रोशन काकडसह संबंधितावर मोकांतर्गत कारवाई सुरू केली होती. यामुळे नागरे याची राजकीय शक्ती वाढल्याचे दिसून आले होते.

मार्ग शोधण्याचा प्रयत्न

आता अधिवेशनात नंतर मात्र विरोधकांनीही मनमाड मार्गे आपला मार्ग शोधायचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. ३१ मार्चला गृहमंत्रालयाकडून वरिष्ठ कार्यसन अधिकारी जी. एस. वाघमारे यांनी खंडणी वसुली प्रकरणी सर्व संशयितांवरील मोका कारवाई हटविण्याचे आदेश देण्यात आले आहे.

नागरे यांच्यामुळेच मोका कारवाईला समोर जात असल्याने नागरे यांच्या त्रासाला कंटाळून अनिरुद्ध शिंदे यांनी त्यांचा मुळ गावी आत्महत्या केल्याचा आरोप शिंदे यांच्या नातेवाइकांनी संशय व्यक्त करत विक्रम नागरे व मुकेश शहाणे यांच्यावर घोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT