fire esakal
नाशिक

नाशिक : देव्हाऱ्यातील दिव्यामुळे घराला आग; लाखोंचे नुकसान

प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी, देव चोरून नेईल, अशी कोणाची पुण्याई या उक्तीची अंमलबजावणी केली असती, तर कदाचित देव्हाऱ्याला आग लागून घरातील लाखो रुपयांचे नुकसान झाले नसते, अशा प्रकारची चर्चा आता अंबड परिसरातील एका घराला लागलेल्या आगीच्या ठिकाणी ऐकायला मिळाली. (House caught fire)

...तर ही दुर्घटना घडली नसती

अंबड येथील एक्सलो पॉईंटजवळील रामकृष्णनगरमध्ये रितेश सिंग यांच्या रो हाऊसमधील वरील रूममध्ये त्यांच्या परिवारातील सदस्यांनी देव्हाऱ्यात दिवा लावला व ते शनिवारी रात्री पाथर्डी फाटा येथील त्यांच्या भावाकडे मुक्कामी निघून गेले. रविवारी सकाळी साडेसातला घरी आल्यानंतर आग लागल्याचे त्यांना कळाले. अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली. या आगीत देव्हारा, फर्निचर, २५ हजारांची रोकड खाक झाली. रात्री दिवा न लावता परिवारातील सदस्य बाहेर निघून गेले असते, तर कदाचित ही दुर्घटना घडली नसती, अशी चर्चा आता तेथील नागरिकांमध्ये ऐकाला मिळत आहे. अग्निशमन दलाचे एम. पी. अहिरे, एम. एन. मधे, प्रमोद लहामगे, एस. जी. भालेराव, एस. बी. शिलावट आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT