The house of farmers Suresh Navale and Balu Gaikwad of Taked Khurd was damaged and the roof blown off. esakal
नाशिक

Pre Monsoon Rain: मॉन्सून पूर्व पावसाने घरांची पडझड; शेतमाल, जनावरांच्या चाऱ्यांचे मोठे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

Pre Monsson Rain : इगतपुरी तालुक्यातील टाकेद परिसरात रविवारी (ता. ४) दुपारी एकच्या सुमारास जोरदार झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने टाकेद खुर्द येथील सुरेश चंदर नवले व शेतकरी बाळू लक्ष्मण गायकवाड यांच्या घरांचे पत्र्याचे छप्पर जवळपास साठ मीटर अंतरावर उडून गेले आहे.

यात ११ केव्ही विद्युत तारा देखील तुटून पडल्या. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही तरी या उडून गेलेल्या छतांमुळे शेजारील ग्रामस्थांचे घराचे मोठे नुकसान झाले आहे. (Houses collapse due to Pre Monsoon Rain Heavy loss of crops animal fodder at taked budruk nashik news)

घटनेमुळे विद्युत तारा तुटल्याने काही काळ वीज पुरवठा खंडित होता. विद्युत तारा तुटल्याची माहिती मिळताच वायरमन सोमनाथ मोरे यांनी आपल्या पथकासह तत्काळ घटनास्थळी धाव घेत वीज पुरवठा सुरळीत केला.

तसेच, टाकेद परिसरात इतर ठिकाणी बागायती पिके, शेतमाल, जनावरांच्या चाऱ्याची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे.

या घटनेची माहिती सरपंच सचिन बांबळे, ग्रामस्थ काळे, पोलिसपाटील शरद निर्मळ यांच्याकडून मिळताच राम शिंदे यांनी घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मार्फत प्रशासनाकडे पंचनाम्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सरपंच सचिन बांबळे, पोलिसपाटील शरद निर्मळ, बहिरू लगड, नवनाथ निर्मळ, ग्रामविकास अधिकारी चौधरी भाऊसाहेब आदींसह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. या घटनेत सुरेश चंदर नवले, बाळू लक्ष्मण गायकवाड, सचिन रामदास बांबळे,

बहिरू गोविंद बांबळे, मीराबाई निवृत्ती मुकणे, भोरु ठमा घाणे, नामदेव चंदर खराटे, निवृत्ती नामदेव निर्मळ, रावसाहेब पलू मुकणे आदी शेतकरी कुटुंबातील घरांचे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav 2025 : पुण्यात गणेश प्रतिष्ठापनेनिमित्त वाहतुकीत बदल, 'हे' रस्ते वाहतुकीस राहणार बंद; पर्यायी मार्गांविषयी जाणून घ्या

MLA Shashikant Shinde: प्रशासन कुणाच्या तरी दबावाखाली काम करतंय: आमदार शशिकांत शिंदे; सध्याची परिस्थिती बदलण्यासाठी जागरूक राहावे

Satara Teachers Bank: 'सातारा शिक्षक बॅंकेची १५ मिनिटांत गुंडाळली वार्षिक सभा'; गैरकारभार, नोकर भरती आदी मुद्द्यांवरून घोषणाबाजी

चेतेश्वर पुजाराची काल निवृत्ती अन् आज दुसऱ्या खेळाडूने माफी मागून मागे घेतला निवृत्तीचा निर्णय; देशासाठी खेळण्यास पुन्हा सज्ज...

Crime News: धक्कादायक ! ६७ वर्षांच्या प्रियकराने ३० वर्षांच्या प्रेयसीची केली हत्या, ३ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT