Lala Jadhav, who came first to the school, standing with the cows. esakal
नाशिक

HSC Result : गुजरातची पोरं ठरली कला शाखेत बाजीगर!

गायी सांभाळून लाला व मालजी बाभूळगावच्या संतोष विद्यालयात अव्वल

सकाळ वृत्तसेवा

HSC Result : इर्षा, प्रचंड तळमळ, परिस्थितीवर मात करण्याची तयारी आणि मनात जिद्द असली की कुठलेही अडथळे यशाच्या आड येत नाहीत, हेच सिद्ध करून दाखविलेय गुजराथमधील गायीचा सांभाळ करणाऱ्या काठेवाडी युवकांनी.!

सकाळी कॉलेज आणि दुपारनंतर गायी चारण्यासाठी भटकंती करत त्यांनी यशाला गवसणी घालतना बाभूळगाव येथील संतोष श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात एक जण प्रथम, तर दुसरा तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. (HSC Result Boy from Gujarat became champion in arts nashik news)

प्रतिकूल परिस्थितीत अन्‌ विशेष म्हणजे कला शाखेतून त्यांनी मिळविलेले हे यश विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. यापैकी लाला नारायण जाधव हा ७९.१७ टक्के गुण मिळवून विद्यालयात पहिला, तर त्याचा चुलतभाऊ मालजी नथू जाधव यानेही ७३.३३ गुणांसह तृतिय क्रमांक पटकावला.

मूळ गुजरातमधील सौराष्ट्र भागातून गायींसह भटकंती करत जाधव कुटुंबिय महाराष्ट्रात आले. काही दिवस बुलढाणा परिसरात राहिल्यानंतर ते बाभुळगावच्या मोकळ्या गायरानात गायी सोडून कुडाच्या घरात राहू लागले.

गायींना चरायला नेणे, त्यांच्या मागे फिरणे, शेण उचलणे, दुध काढणे, चारा आणणे हाच परंपरागत उद्योग असणाऱ्या या कुटुंबात सर्वच अशिक्षित. सतत भटकंतीमुळे मुलांच्या शिक्षणावरही परिणाम होतोच.

तरीदेखील मुलांनी शिकावे व या परंपरागत व्यवसायाला छेद देऊन उंच भरारी घ्यावी, ही आई-वडिलांची इच्छा होती. त्यामुळे येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षणानंतर तीन भाऊ व एक बहीण अशा सर्वांनी संतोष विद्यालयात प्रवेश घेतला.

घरी गायी सांभाळून अभ्यास करायचा हेच समीकरण आयुष्यात वाट्याला आलेले असतानाही या भावंडांनी शाळेत चुनुक दाखविली. यामुळे आई-वडिलांनाही हुरूप आला. लाला याने दहावीतही ९० टक्के गुण मिळविलेले आहेत. विज्ञान शाखेत प्रवेश मिळाला असताना केवळ स्पर्धा परीक्षांचे ध्येय असल्याने त्याने अकरावीत कला शाखेत प्रवेश घेतला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मालजीही आला तिसरा!

लालाचा चुलतभाऊ मालजी यानेही हालाखीच्या परिस्थितीत संघर्ष करत विद्यालयात तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्यानेही गायींचा साभाळ करताना कुटंबाच्या अपेक्षांचे ओझेही पेलले. लाला व मालजीच्या या यशाचे संस्थेचे अध्यक्ष आमदार नरेंद्र दराडे, शिक्षक आमदार किशोर दराडे, प्रशासकीय अधिकारी समाधान झाल्टे, सहअधिकारी सुनील पवार, प्राचार्य गोरख येवले, उपप्राचार्य आप्पासाहेब कदम, किरण पैठणकर, मनोज खैरे यांनी अभिनंदन केले आहे.

या विद्यार्थ्यांना किरण गायकवाड, नवनाथ जाधव, अजित देठे, रमीन कादरी, अन्वर शहा आदींचे मार्गदर्शन लाभले.

"लाला व मालजी हे विद्यार्थी पाचवीपासून आमच्या विद्यालयात आहेत. आमच्या संस्थेत अनेक विद्यार्थ्यांनी नावलौकिक करून मल्टीनॅशनल कंपन्यांसह शासनात नोकऱ्या मिळविल्या आहेत. या दोघांनाही पुढील शिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य आम्ही करू."

-रुपेश दराडे, कार्यकारी संचालक, जगदंबा शिक्षण संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT