pr. mangesh joshi.jpg 
नाशिक

VIDEO : बिनपगारी ज्ञानदान करणाऱ्या 'शिक्षकांसाठी' चक्क पुरस्कार!

हर्षवर्धन बोऱ्हाडे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : (नाशिक रोड) सध्याच्या काळात गुरुजी अर्थात शिक्षकांबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत. त्यातील एक गैरसमज असा की, शिक्षकांना गलेलठ्ठ पगार आहेत. 
मात्र, हे सर्वच शिक्षकांसाठी लागू पडतेच असे नाही. माता सरस्वतीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कितीतरी शिक्षकांना अनेक वर्षापासून वेतन नाही हे बऱ्याच जणांना माहित देखील नाही. त्यांच्या कामाची कोणी दखल ही घेत नाही. हे विदारक कटू सत्य आहे. म्हणून नाशिक रोड येथील 22 वर्ष इंग्रजी विषयाचे विनावेतन अध्यापन करणाऱ्या प्राध्यापक मंगेश जोशी यांनी अनेक वर्षे विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांसाठी 'देव माणूस' पुरस्काराची घोषणा केली आहे.

ज्ञानदानाचे पवित्र काम करणाऱ्या शासकीय नियमाने होरपळलेल्या शिक्षकांसाठी

बावीस वर्षे विनावेतन एका शिक्षण संस्थेत काम करून खाजगी शिकवणी चालून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या मंगेश जोशी यांनी आपल्याला जो विना वेतनाचा अभिशाप मिळाला, तो आपल्याच क्षेत्रातल्या गेले. अनेक वर्षे बिन पगारी फुल अधिकारी काम करणाऱ्या शिक्षकांसाठी हा 'देवमाणूस पुरस्कार' घोषित केला आहे. प्रारंभीच्या काळात विनाअनुदानित हा शब्द सहजपणे अनुदानित होऊन जाईल या भोळ्या अपेक्षेने जीवाचं रान करून अध्यापन करीत गेली अनेक वर्षे विनामोबदला विनावेतन ज्ञानदानाचे पवित्र काम करणाऱ्या शासकीय नियमाने होरपळलेल्या शिक्षकांसाठी प्रा. मंगेश जोशी यांनी हा पुरस्कार सुरू केला आहे.

अनेक शिक्षक आपले योगदान देऊ पाहताय...

शासनाचे निब्रट धोरणापायी आज अनेक शिक्षक गेली अनेक वर्षे विनामोबदला विनावेतन काम करीत आहे. काही शिक्षक सेवा निवृत्तीच्या वयापर्यंत पोहोचले असून, अजूनही ते कायम झालेले दिसत नाही. म्हणून शिक्षण क्षेत्रात विनामोबदला काम करणाऱ्या आपल्याच बांधवांसाठी प्राध्यापक मंगेश जोशी यांनी सुरु केलेला पुरस्काराची चर्चा सध्या नाशिक जिल्ह्यात रंगू लागली आहे. अकरा हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ  व ग्रंथ असे या पुरस्काराचे स्वरूप असून यामध्ये अनेक शिक्षक आपले योगदान देऊ पाहत आहे. या वर्षीचा पुरस्कार नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातील शेनीत येथे वीस वर्षे विनावेतन काम करणाऱ्या 'नारायण एखंडे' यांना जाहीर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इंधन तेलाच्या दराचा भडका उडणार, USचा खार्ग बेटावर हल्ला; ९० टक्के कच्च्या तेलाची इथूनच होते निर्यात

IT Park Kolhapur : कोल्हापुरातील आयटी पार्कसाठी जमीन हस्तांतरणाचा आदेश, महानगरपालिकेची परवानगी घ्यावीच लागणार

Latest Marathi News Live Update : श्री अंबाबाई मूळ मूर्तीचे दर्शन आजपासून बंद, चार दिवस होणार गाभारा संवर्धन प्रक्रिया

एका दिवसाच्या सोबतीसाठी वाट्टेल ते! साई पल्लवीचा अमिर खानच्या लेकासोबत रोमान्स, अनोखी प्रेमकहाणी चर्चेत

Paithan News: नाथषष्ठी यात्रेत पैठणची बाजारपेठ फुलली; तीन दिवसांत २५ कोटींची उलाढाल; संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी यात्रेत भाविकांची गर्दी,

SCROLL FOR NEXT