Bhagwat Zalte while helping Manmad Railway Police Nagesh Dande. esakal
नाशिक

Humanity : देवदूत बनून आलेल्या तरुणाने वाचवले पोलिस कर्मचाऱ्याचा जीव!

सकाळ वृत्तसेवा

Humanity : काळ आला होता पण वेळ आली नव्हती या उक्तीचा प्रत्यय मनमाडकरांना आला. तो आलाच नसता तर कदाचित त्याचे प्राण वाचलेही नसते असेच सर्वांकडून बोलले गेले. रस्त्याने जात असताना अचानक एका पोलिस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि क्षणार्थात तो कर्मचारी जमिनीवर कोसळली.

नेमके काय झाले हे कुणालाच कळेना. बघ्यांची गर्दी झाली. गर्दी झाल्याने काय झाले म्हणून एक तरुण पाहू लागला. त्याला समजले काय झाले. त्याने तत्काळ प्राथमिक उपचार केल्याने पोलिसाचा प्राण वाचवले. तरुणाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्या पोलिसाला देवदूतच भेटल्याची चर्चा मनमाडमध्ये सर्वत्र पसरली. (Humanity young man who saved railway policemans life at manmad nashik news)

रेल्वे पोलिसात कामाला असलेले नागेश दांडे हे शहरातील सोनार गल्लीतून आपल्या मोटारसायकलने कामावर जात होते. मात्र अचानक छातीत दुखू लागले. छातीत जोरात कळ आल्याने त्यांचा तोल जाऊन खाली पडले.

अपघात झाला की काय म्हणून सभोवताली लोकांची गर्दी झाली. जो तो पाहू लागले. ही गर्दी सावरत भागवत झाल्टे हे पुढे आले नक्की काय झाले हेही त्यांच्या लक्षात येत नव्हते. मात्र छातीला हात लावून दांडे हे विव्हळत होते.

त्यांच्या ताबडतोब लक्षात आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता. दांडे यांची छाती हाताने दाबून प्रेस केली. दोनदा तीनदा केले. दांडे यांचा श्वास फुलू लागल्याने त्यांनी तातडीने त्यांच्या तोंडावर रुमाल टाकून श्‍वास दिला.

यामुळे श्री. दांडे शुद्धीवर आल्याने उपस्थितांनी तातडीने दांडे यांना येथील हृदयरोगतज्ञ डॉ. संदीप कुलकर्णी यांच्या दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी त्यांनी तातडीने तपासणी केली असता त्यांना हृदयविकाराचा जोरदार धक्का बसल्याचे निष्पन्न झाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मात्र, झाल्टे यांनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळे त्यांचे प्राण वाचले. वेळेवर भागवत झाल्टे धावून आले नसते तर कदाचित अघटीत घटना घडली असती. मात्र देवदूत यावा अगदी तसेच भागवत झाल्टे हे नागेश दांडे यांच्यासाठी धावून आले.

व्हिडिओ सोशल मिडियावर प्रसारित

कातरवाडी (ता. चांदवड) येथे राहणारे भागवत झाल्टे हे खासगी कामानिमित्त मनमाड शहरात आले होते. वर्दळीचे ठिकाण असलेल्या सोनार गल्लीतून जात असताना रस्त्यात गर्दी कशाची जमली आहे हे पाण्यासाठी ते गेले होते.

त्यावेळी झालेला प्रकार त्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी क्षणाचाही विचार न करता नागेश दांडे यांना मदत केली. अगदी देवदूत धावून यावा तसे भागवत झाल्टे धावून आले. समाजमाध्यमावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दोन कोटींची लाच मागणाऱ्या PSIच्या घरात ५६ लाखांची रोकड, सोन्याचे दागिने अन् मालमत्तेची कागदपत्रे; झडतीत काय सापडलं?

Video: प्राजक्ता माळीला काय झालय? रेड कार्पेटवर अशा का अवतारात आली? फोटोग्राफर्संना सुद्धा कळेना, नंतर म्हणाली...

World Cup उंचावणाऱ्या हातांना लागणार मेंहदी, स्मृती मानधनाच्या घरी आता लगीनघाई, कधी होणार विवाह?

MP Udayanraje Bhosale: लोकांवर अन्याय झाल्यावर आवाज उठवतोच: खासदार उदयनराजे: साताऱ्यातील मनोमिलनाेबाबत केलं माेठे विधान..

Ladki Bhin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी ! आजपासून खात्यात जमा होणार 'इतके' पैसे

SCROLL FOR NEXT