rakshabandhan esakal
नाशिक

बहीण-भावाच्या रक्षाबंधनाची 'शंभरी'! एका नात्याची गोड कहाणी

माणिक देसाई

निफाड (जि.नाशिक) : बहीण- भावाच्या पवित्र नात्याचा सण रक्षाबंधन.(rakshabandhan) निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील बहीण- भावाने रविवारी (ता. २२) आपल्या रक्षाबंधनाची शंभरी गाठल्याने या रक्षाबंधनाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाल्याचे चित्र होते. वाचा एका नात्याची गोड कहाणी....

बहीण-भावाच्या नात्याने गाठली "शंभरी"!

कुंदेवाडी (ता. निफाड) येथील कदम परिवारात १ नोव्हेंबर १९१७ मध्ये ‌सत्यभामा यांचा, तर २१ जुलै १९२१ मध्ये आनंदराव या भावंडांचा जन्म झाला. आई-वडिलांकडे बालपण‌ व्यतीत केल्यानंतर सत्यभामा यांची रेशीमगाठ सावरगावच्या देवाजी कुशारे यांच्या कुटुंबातील दादासाहेब यांच्यासोबत २५ मार्च १९३० मध्ये बांधली गेली. सत्यभामा संसारात रममाण झाल्या. दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार विस्तारला. प्रत्येक वर्षी रक्षाबंधनाला भाऊ आनंदरावांना राखी बांधण्यासाठी जात. ऋणानुबंध अतूट ठेवले. बंधू आनंदरावांना दोन मुली, तीन मुले, नातवंडे असा कुटुंबकबिला विस्तारला. सुख- दुःखाचे प्रसंग आनंदराव कदमांना स्पर्शून गेले. स्वातंत्र्यपूर्व काळातील रात्रशाळेत तिसरीपर्यंत आनंदरावांनी शिक्षण घेतले. वयाची शंभरीही आनंदरावांनी पूर्ण केली आहे. सत्यभामा यांनी वयाची १०४ वर्षे गाठली. मात्र, रक्षाबंधनासह बहीण- भावाच्या नात्याचा एकही सण सोडला नाही. शंभरी पार केलेल्या भाऊ आनंदरावांना रक्षाबंधनाची राखी बांधून बहीण सत्यभामा यांनी शंभरावे रक्षाबंधन साजरे केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''वृक्षतोडीबाबत ‘फेक नॅरेटिव्ह’ पसवण्याचा प्रयत्न'', CM फडणवीसांनी सांगितलं कर्जतमधील टोरेंट प्रकल्पाचं महत्त्वं, काय म्हणाले?

'मला साडीत बघून माझ्या सासूने ओळखलंच नाही'; सचिन पिळगांवकरांनी माधुरी दीक्षितला सांगितला 'अशी ही बनवाबनवी'चा किस्सा, म्हणाले...

Beed FDA Action: दिवाळीपूर्वी बीडमध्ये FDA चे छापे; पाबळे नमकीन आणि मामा काठियावाडीचे परवाने निलंबित

‘एका तासात इस्रायलला राहण्यायोग्य ठेवणार नाही’; इराणचा नेतान्याहूंना थेट इशारा, थेट नकाशाच शेअर केला...

Pune MPSC News: एमपीएससी चौकशी आयोगाची अद्याप एकही बैठक नाही; उर्वरित ४५ दिवसांत तपास कसा पूर्ण होणार?

SCROLL FOR NEXT