couple
couple esakal
नाशिक

पैशासाठी पतीकडून पत्नीचा वैयक्तिक व्हिडीओ व्हायरल; अजब प्रकाराने पोलिसही गोंधळले

प्रमोद सावंत

मालेगाव (जि.नाशिक) : शहरातील (malegaon) रमजानपुरा भागात घडलेल्या अजब प्रकाराने पोलिसही (police) गोंधळून गेले. यासाठी पतीनेच पैशासाठी पत्नीची इभ्रत चव्हाट्यावर आणण्याचा प्रकार घडला. काय घडले नेमके? (crime malegaon nashik marathi news)

पत्नीचे वैयक्तिक व्हिडिओ चव्हाट्यावर

पत्नीने यंत्रमाग कारखान्यासाठी माहेरुन पाच लाख रुपये आणावेत यासाठी पतीनेच पैशासाठी पत्नीची इभ्रत चव्हाट्यावर आणण्याचा प्रकार घडला. पती-पत्नीच्या शारीरिक संबंधाचे व्हिडिओ चित्रीकरण पतीनचे नातेवाईकांना पाठविले. रमजानपुरा भागात अताउर्रहेमान निहाल अहमदच्या (वय 34) बहिणीचे घर आहे. येथे पत्नीशी शारीरिक संबंध करतानाचे व्हिडिओ व फोटो त्याने काढले. पत्नीला ते दाखवत यंत्रमाग कारखान्यासाठी पाच लाख रुपये घेऊन ये, नाहीतर हे चित्रीकरण व फोटो व्हायरल करेल अशी धमकी दिली. दोन आठवड्यापुर्वी हा प्रकार घडला.

पत्नीविरूध्द गुन्हा दाखल

वारंवार मागणी करुनही पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्याने अताउर्रने त्याच्या पत्नीचा पुतण्या अरबाज शेख याला हे चित्रीकरण व फोटो पाठवून आपली इभ्रत चव्हाट्यावर आणली व अब्रुनुकसान केल्याची तक्रार पत्नीने दिली आहे. पत्नीच्या तक्रारीनंतर उपअधिक्षक लता दोंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस निरीक्षक बाळासाहेब थाेरात व सहकाऱ्यांनी चौकशी केली. रविवारी सायंकाळी गुन्हा दाखल होताच रात्री अताउर्रला अटक केली.रमजानपुरा पोलिस ठाण्यात या प्रकरणी अताउर्रहेमान निहाल अहमद (वय 34) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT