Husband Ashish Kaushik esakal
नाशिक

Nashik Crime News : पत्नीवर वार करणाऱ्या पतीचा सिडकोत मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

सिडको (जि. नाशिक) : पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केल्यानंतर घरातच पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी (ता. १६) सिडकोत घडली. (Husband who stabbed his wife dies in cidco Nashik Crime News)

अश्‍विननगर येथे संभाजी स्टेडियमसमोरील एका बंगल्यात राहणारे आशिष कौशिक (वय ६०) यांनी गुरूवारी सकाळी साडेआठच्या सुमारास पत्नी ज्योती (वय ५४) यांच्यावर घरातील बेडरूममध्ये धारदार शस्त्राने वार केले.

यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर बेडरूममधून बाहेर जात कौशिक यांनी मुलगा देव याच्यावरही वार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे देव हा बेडरूममध्ये पळाल्याने बचावला. मात्र, आईला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून त्याने नातेवाईकांना मदतीसाठी बोलावले.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

त्यानुसार नातेवाईक तेथे आले असता देव बाहेर आला असता, त्याला वडिल आशिष कौशिक हे जमिनीवर पडलेले दिसले. त्यामुळे आशिष व ज्योती यांना तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी आशिष यांना मृत घोषित केले.

दरम्यान, आशिष यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण शेवाळे, उत्तम सोनावणे तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Doctor Case: 'आरोपींवर कुठलीही दया दाखवली जाणार नाही', Rupali Chakankar संतापल्या | Sakal News

Satara : महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी अंबादास दानवेंचे गंभीर आरोप, थेट भाजपच्या माजी खासदाराचं नाव घेतलं

Latest Marathi News Live Update : भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे वक्तव्य — “आमचे मार्गदर्शक भुजबळसाहेब” म्हणत गोंधळ

Ishwarpura News : बाळासाहेब ठाकरेंची अखेर इच्छा पूर्ण, इस्लामपूरचे झाले ‘ईश्वरपूर’; सर्व दस्ताऐवजांमध्ये होणार बदल

AUS vs IND 3rd ODI: भारताचे गोलंदाज चमकले, ऑस्ट्रेलियाला अडीचशेच्या आत रोखले; आता व्हाईटवॉश टाळण्याचं लक्ष्य

SCROLL FOR NEXT